वसतिगृहात तीन विद्यार्थ्यांना सर्पदंश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

चामोर्शी, (जि. गडचिरोली) - चामोर्शी तालुक्‍यातील वायगाव येथील समता मुलांच्या वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा मंगळवारी (ता. एक) रात्री अकराला सर्पदंशाने मृत्यू झाला. अतुल संजय कुद्रपवार व ऋतिक घनशाम गुड्डी अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर, सर्पदंश झालेला अन्य एक विद्यार्थी धर्मदीप सुनील रामटेके याच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वायगाव येथील समता वसतिगृहात असलेल्या तीन विद्यार्थ्यांना रात्री सर्पदंश झाला. यातील अतुल कुद्रपवार व ऋतिक गुड्डी यांचा मृत्यू झाला. धर्मदीप रामटेके याला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मिलिंद ज्ञान प्रसारक शिक्षण मंडळ नवरगाव ता. सिंदेवाही या संस्थेमार्फत वायगाव येथे १९९५, ९६ मध्ये समता मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. या वसतिगृहात २४ विद्यार्थी वास्तव्यास होते. समाजकल्याण संचालयाकडून अनुदान दिले जात आहे. मात्र, वसतिगृहात सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच खासदार अशोक नेते व आमदार डॉ. होळी मुंबई अधिवेशनात व्यस्त असल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणून भाजप किसान आघाडीचे महामंत्री मनमोहन बंडावार व तालुका महामंत्री विनोद गौरकार यांनी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट दिली. या घटनेची चौकशी आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार लुकडे करीत आहेत. मृत संजय कुद्रपवार व ऋतिक गुड्डी नवव्या वर्गात शिकत होते.

संस्थाचालकाचा दुर्लक्षितपणा
वसतिगृहाची इमारत जीर्ण झाली असून विद्यार्थी फुटलेल्या फरशीवर गादी टाकून झोपतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साप विंचू आदींपासून धोका असतो. मात्र, असे असतानाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी संस्थाचालकाने काहीही उपाययोजना केल्या नसल्याने दोन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला.

Web Title: gadchiroli news student Snake bite