शिक्षकांनी भररस्त्यात भरविली शाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

देसाईगंज (जि. गडचिरोली) - वारंवार मागणी करूनही भाडे न दिल्याने संतापलेल्या घरमालकाने शाळेच्या इमारतीला कुलूप ठोकल्याने विद्यार्थ्यांनी चक्क रस्त्यावर  शाळा भरवून संताप व्यक्त केला. हा प्रसंग मंगळवारी (ता. १६) देसाईगंज येथील मानवता वॉर्डात घडला. याला संबंधित शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार असून त्यांच्यावर  कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. 

देसाईगंज येथील माता वॉर्डात असलेल्या मानवता प्राथमिक शाळा इमारतीचे भाडे मागील  कित्येक महिन्यांपासून थकीत आहे. याबाबत घरमालकाने अनेकदा विचारणा करून भाडे देण्याची मागणी केली. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. अखेर घरमालकाने शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे शिक्षकांना रस्त्यावर शाळा भरवावी लागली. मात्र, मुख्याध्यापकांनी या मुद्यावर कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title: gadchiroli news teacher school