शिक्षण घ्यायला येतो की दारू कशी असते हे शिकायला?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

एटापल्ली (गडचिरोली): शाळा, महाविद्यालय परिसरात अतिक्रमन करुन अवैध व्यवसाय केल्या जात असल्याबाबत तक्रारीची दखल घेवून जिल्हा परिषद सदस्य सारिका आईलवार व पंचायत समिती उपसभापती नितेश नरोटे यांनी समुहनिवासी शाळेला भेट देवून समस्या जाणून घेताना विद्यार्थ्यांनी चक्क दारुच्या रिकाम्या बाटला व जुगाराचे पत्ते दाखवत आम्ही शिक्षण घ्यायला येतो की दारू कशी असते व जुगार कसा खेड़ला जातो हे शिकायला येतो का? असा जाब विचारला तसेच शाळेत प्रवेश घेताच आम्हाला दारुच्या बाटला व जुगाराचे पत्ते दृष्टिस् पडतात व त्याची साफ सफाई करुण आमची शैक्षणिक अभ्यास तासिका सुरु होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, समूह निवासी प्राथमिक शाळा, ग्रामीण रुग्णालय तथा शासकीय कार्यालय परिसर अशा मुख्य रस्त्यालगतच्या भुखंडावर अतिक्रमने करुण शासकीय भूखंड हड़प केल्या जात असल्याची तक्रार विविध पक्ष व सामाजिक संघटना पदधिकार्यांनी निवेदनातून प्रशासनाकडे केली आहे.

अतिक्रमण धारक शासकीय भुखंडावर अतिक्रमने करुण टिनाचे सेड, झोपड्या व पानटप-यांची उभारणी करुण त्यात जुगार अड्डे, गांजा, दारुचे गुत्थे, प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटका व खर्रा विक्रीचे अवैध व्यवसाय करीत असल्याची ओरड विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडून केली जात होती. विद्यार्थी दूरव्यसनी होत असल्याची चिंताजनक बाब लक्षात घेवून जिल्हा परिषद सदस्य आईलवार व उपसभापती नरोटे यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट दिली. गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांचे निदर्शनात आणून देत योग्य कार्यवाही करुन अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: gadchiroli news zp school area Encroachment and illegal business