गडचिरोली पोलिस दलाला मिळणार स्वतःचे हेलिकॉप्टर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

गडचिरोली : जवानांना वेळेवर मदत मिळावी तसेच जखमींवर तत्काळ उपचार करता यावा या हेतूने गृह खात्याने गडचिरोली पोलिस प्रशासनाला हेलिकॉप्टर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात खरेदीची प्रक्रिया जोमाने सुरू असून नवीन हेलिकॉप्टर लवकरच जवानांच्या दिमतीला दिसणार आहे. यापूर्वी पवनहंस नामक खासगी हेलिकॉप्टर गेल्या काही वर्षांपासून भाड्याने उपलब्ध करून दिले होते. मात्र या कालावधीत जवळपास 45 कोटींवर भाडे देण्यात आले. एवढ्या खर्चात पोलिस दलाला स्वतःचे हेलिकॉप्टर विकत घेता आले असते.

गडचिरोली : जवानांना वेळेवर मदत मिळावी तसेच जखमींवर तत्काळ उपचार करता यावा या हेतूने गृह खात्याने गडचिरोली पोलिस प्रशासनाला हेलिकॉप्टर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात खरेदीची प्रक्रिया जोमाने सुरू असून नवीन हेलिकॉप्टर लवकरच जवानांच्या दिमतीला दिसणार आहे. यापूर्वी पवनहंस नामक खासगी हेलिकॉप्टर गेल्या काही वर्षांपासून भाड्याने उपलब्ध करून दिले होते. मात्र या कालावधीत जवळपास 45 कोटींवर भाडे देण्यात आले. एवढ्या खर्चात पोलिस दलाला स्वतःचे हेलिकॉप्टर विकत घेता आले असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने गडचिरोली पोलिस प्रशासनाला नवीन हेलिकॉप्टर देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दशकांपासून नक्षलवाद्यांशी दोन हात करणाऱ्या गडचिरोली पोलिसांनी मागील दोन वर्षांत नक्षलवाद्यांच्या विरोधात राबविलेल्या धडक मोहिमेमुळे नक्षल संघटनेचे मोठे नुकसान झाले आहे. सिरोंचा तालुक्‍यात 1980 मध्ये नक्षल घटनांनी आपले पाय रोवले, त्यानंतर हळूहळू स्थानिक तरुणांना हाताशी धरून संपूर्ण जिल्ह्यात संघटनेचे जाळे पसरविले. 2009मध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात 51 जवान शहीद झाले होते. दरम्यानच्या काळात नक्षल घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. घनदाट जंगल, दुर्गम गावे, नदी, नाले व पहाडी यामुळे अभियान राबविताना अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिस प्रशासनाने शासनाकडे हेलिकॉप्टरची मागणी केली होती. गृहखात्याने याची दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात एक खासगी हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले होते. चकमकीच्यावेळी घटनास्थळी कुमक पोचवणे, जखमी जवानांना तत्काळ रुग्णालयापर्यंत पोचवणे तसेच निवडणूक काळात कर्मचारी तसेच जवानांना दुर्गम भागातील निवडणूक केंद्रावर पोचविण्याच्या कामासाठी या हेलिकॉप्टरची मदत होत होती. मात्र भाडे परवडण्यासारखे नसल्याने स्वतःचे हेलिकॅप्टर उपलब्ध करून देण्याची मागणी गडचिरोलीच्या पोलिस प्रशासनाने गृहखात्याकडे केली होती. या मागणीला गृहविभागाने हिरवी झेंडी मिळाली असून लवकरच पोलिस दलात नवीन हेलिकॉप्टर दाखल होणार आहे.

Web Title: gadchiroli police department