गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघ

गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

गडचिरोली : धानपिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेलेल्या एका महिलेला वाघाने ठार केल्याची घटना शुक्रवार (ता. १३) सकाळी ७ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील अरसोडा गावानजीक घडली. नलू बाबूराव जांगडे (वय ३५) रा. अरसोडा, असे मृत महिलेचे नाव आहे.पती आजारी असल्याने नलू शुक्रवारी सकाळी उन्हाळी धानपिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेली होती. मात्र, बांधाआड दडून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. यात ती जागीज ठार झाली. ही बातमी कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

त्यावेळी वाघ त्याच परिसरात होता. आरडाओरड करुन नागरिकांनी वाघाला पिटाळून लावले. घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नलू जांगडे हिच्या पश्चात पती व तीन मुली आहेत.

Web Title: Gadchiroli Tiger Attack Woman Killed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top