गडचिरोली : वैनगंगा नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गडचिरोली : वैनगंगा नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

आरमोरी (जि. गडचिरोली) : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी – आरमोरी मुख्य महामार्गावर असलेल्या नदीघाट पुलाजवळील वैनगंगा नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज (ता. २०) सकाळी ११ ते १२ वाजता दरम्यान घडली. मृताचे नाव अभिनव दौलतराव कुथे (वय २३) असून आरमोरी येथील रहिवाशी आहे. (Vidarbha water Accident)

सविस्तर वृत्त्तानुसार अभिनव व त्याची आई हे आरमोरी येथून नदीघाट पुलाजवळ वैनगंगा नदीपात्राताजवळील एका हाॅटेलमध्ये जेवायला गेले हाेते. दरम्यान ते नदीपात्राकडे आंघोळ करायला आले. आई नदीपात्रात थोड्या पाण्यात उभी होती. मुलगा अभिनव हा जास्त पाण्यात पोहायला गेला. काही वेळ पोहतच होता. मात्र मागील दोन दिवसांपासून वैनगंगा नदीपात्र पाण्याची पातळी वाढली आहे.

हेही वाचा: केंद्राचे अपयश झाकण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून आरोप : नीलम गोऱ्हे

त्यामुळे काही क्षणातच अभिनव वैनगंगा नदी पात्रात लुप्त झाला. खूप वेळ झाला मात्र अभिनव पाण्याच्या बाहेर दिसला नाही. मृत अभिनवचे वडील सेवानिवृत्त शिक्षक असून आई जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे. पोलिस विभागाला घटनेची माहिती देण्यात आली असून या घटनेचा तपास सुरू आहे. पोलिस विभागाकडून नदीपात्रात शाेधमाेहीम सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत अभिनवचा मृतदेह मिळाला नव्हता.

Web Title: Gadchiroli Vainganga River Water Death Youth

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :watervidarbhadeath
go to top