गडकरी अन्‌ सरसंघचालकांची बंदद्वार चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

नागपूर  : राज्यात अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना, राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत. अशात जिव्हाळा पुरस्कार सोहळ्याला मंचावर एकत्र आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अन्‌ सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुमारे तीस मिनिटे बंदद्वार चर्चा केली. यावेळी संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अन्‌ आमदार अनिल सोले उपस्थित होते. आत काय घडले हे गुलदस्त्यात असले तरी पूर्ती बाजारात झालेल्या "चाय पे चर्चे'ची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

दान पारमिता (जिव्हाळा) संस्थेतर्फे सायंटिफिक सभागृहात जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळा आटोपल्यानंतर सभागृहाच्या तळमजल्यावर असलेल्या पूर्ती सुपर बाजाराला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भेट दिली. याप्रसंगी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी स्वत: उपस्थित होते. बराचवेळ त्यांनी बाजारातील कक्षात चर्चा केली. चहाचा आस्वादही घेतला. मात्र या दोघांमध्ये नेमकी काय घडले. राज्यात सत्तास्थापनेसंदर्भात काही चर्चा झाली का? अथवा देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत दोघे एकमेकांशी काही बोलले का? याबाबत स्पष्टपणे कळू शकलेले नाही. बाहेर मात्र चर्चा राजकीय असल्याचेच वारे वाहत होते. अखेरपर्यंत ट्‌विस्ट कायम होता. आम्ही केवळ चहापानासाठी थांबलो होतो, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadkari and RSS alliance discuss door