जादुगाराने घेतला गडकरींचा राजीनामा!

nitin gadkari
nitin gadkari

जादुगाराने घेतला गडकरींचा राजीनामा!
नागपूर : प्रसिद्ध जादुगार एन. सी. सरकार यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर त्यांचेच राजीनामापत्र तयार करून साऱ्यांना अवाक केले. जादूने तयार केलेले हे पत्र पाहून खुद्द नितीन गडकरी यांची हसता हसता पुरेवाट झाली.
नितीन गडकरी यांच्या एका मित्राकडे दिवाळीनिमित्त स्नेहमीलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. यावेळी तेथे प्रसिद्ध जादुगार एन. सी. सरकार यांच्या जादूचा कार्यक्रम आयोजित केला होता. एन. सी. सरकार यांनी अनेक प्रकारच्या जादू दाखवून गडकरींना हसायला लावले. जादुगार सरकार यांनी त्यांना हवेतून काढून सोन्याची साखळी गडकरींना दिली. ही साखळी घेण्यास गडकरींनी नकार दिला. अखेर ही साखळी जादुगार सरकार यांनीच ठेवून घेतली. जादुगार सरकार यांनी एक प्रशस्तिपत्र गडकरींना दिले. त्यावर गडकरींची स्वाक्षरी घेतली. ही स्वाक्षरी करून गडकरी चांगलेच अडचणीत आले. गडकरी यांनी ज्या प्रशस्तिपत्रावर स्वाक्षरी केली. त्या प्रशस्तिपत्राचे रूपांतर राजीनामापत्रात झाले. या पत्रात आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत असून राजकारणातून संन्यास घेऊन हिमालयात जात आहोत आणि माझ्या केंद्रीय मंत्रिपदाचा कार्यभार जादुगार एन. सी. सरकारकडे सोपवीत असल्याचा मजकूर होता. जादूच्या या राजीनामापत्रातील मजकूर वाचून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची हसता हसता पुरेवाट झाली. यानंतर गडकरी यांनी एन. सी. सरकार यांच्या जादूच्या कौशल्याची प्रशंसा केली व पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com