गडकरी विमानतळावरून परतले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. त्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून गडकरी घरी परतले.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. त्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून गडकरी घरी परतले.
उड्डाणाच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात येताच उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान धावपट्टीवरून टॅक्‍सीवेकडे नेण्यात आले. विमानतळावरील सूत्रांच्या माहितीनुसार, इंडिगोचे 6 ई 636 नागपूर-दिल्ली हे विमान सकाळी 9.30 वाजता नागपूरहून रवाना होण्यासाठी सज्ज होते. ते रनवेवर धावायला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच विमानात गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्याने लगेच विमान रोखले आणि शेडच्या दिशेने वळवले. नागपूर विमानतळावरील अभियंत्यांनी विमानाची चाचपणी केली. यानंतर 10.45 वाजताच्या सुमारास पुन्हा विमान उड्डाणाचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तोसुद्धा यशस्वी ठरला नाही. यानंतर उड्डाणच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे नितीन गडकरी यांच्यासह अन्य प्रवाशांचीही गैरसोय झाली. विमानच रद्द झाल्याने गडकरी विमानतळावरून निवासस्थानाकडे रवाना झाल्याची माहिती आहे.
जम्मू-काश्‍मीरच्या विभाजनासह 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयानंतर अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. शिवाय विमानतळांवरही सुरक्षेची काळजी घेतली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadkari returned from the airport