खासदार महोत्सवाला गडकरी यांची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

खासदार महोत्सवाला गडकरी यांची हजेरी
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी अहमदनगर येथे एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कोसळल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. दिवसभर व्हॉट्‌सऍपवर ते बेशुद्ध झाल्याच्या चर्चा सुरू होती. त्यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली जात होती. वैद्यकीय उपचार घेऊन गडकरी विशेष विमानाने नागपूरला पोहोचले. तुमच्या आशीर्वादाने सुखरूप असल्याचे त्यांनी सांगताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी सायंकाळी खासदार महोत्सवालाही उपस्थिती लावली.

नितीन गडकरी तातडीने विशेष विमानाने नागपूरला दुपारी दाखल झाले. त्यांची खुशाली जाणून घेण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते विमानतळावर पोहोचले. प्रसिद्धी माध्यमांच्याही प्रतिनिधींनी धाव घेतली. विमानतळाच्या बाहेर येताच त्यांनी फक्त भोवळ आली होती. त्यापेक्षा काही जास्त झालेले नाही. तुम्ही चिंता करू नका मी स्वस्थ आहे, असे त्यांनी सांगितले. काहीवेळ घरी आराम केल्यानंतर नितीन गडकरी यांनी आपले नियोजित कामे केली. सायंकाळी खासदार क्रीडा महोत्सवातही दाखल झाले. येथील व्यासपीठावरूनही आपण ठिकठाक असल्याचे त्यांनी जाहीर केले. असे असले तरी त्यांची उद्या त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. विमानतळावर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपच्या प्रदेश प्रभारी सरोज पांडेय, शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, ग्रामीणचे अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आमदार कृष्णा खोपडे, अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे, रमेश मंत्री, कृष्णा खोपडे यांच्यासोबत ते रामनगर येथील भक्ती बंगल्यावर पोहोचले. त्यांनी दीड तास आराम केला.

Web Title: Gadkari's attendance at MP's Festival