निवडणुकीत सर्वाधिक खर्च गडकरी यांचा

नितीन गडकरी
नितीन गडकरी

नागपूर : नागपूर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक रक्कम भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी खर्च केली. त्यांच्यापाठोपाठ कॉंगेसचे नाना पटोले यांचा क्रमांक आहे. दोघांच्या मतांमधील अंतर दोन लाखांवर असले तरी खर्चातील तफावत केवळ 80 हजारांच्या घरात आहे.
गडकरींनी मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 20 लाखांची अतिरिक्त रक्कम खर्च केली. यंदाची लोकसभा निवडणूक आतापर्यंतची सर्वाधिक खर्चिक असल्याचे बोलले जाते. नागपूर लोकसभा निवडणुकीत 30 उमेदवार रिंगणात होते. यातील 29 उमेदवारांनी निवडणूक विभागाला खर्चाची माहिती दिली. यानुसार, 1 कोटी 75 लाख 17 हजारांवर उमेदवारांनी खर्च केला. प्रत्यक्षात हा खर्च शंभर कोटींच्या घरात असल्याची चर्चा आहे.
गडकरींना या निवडणुकीत 6 लाख 60 हजार 221 मते तर पटोले यांना 4,44,212 मते मिळाली. गडकरींनी निवडणूक विभागाला दिलेल्या माहितीनुसार, 44 लाख 88 हजार 041 रुपये खर्च केले. त्यांना मिळालेली मत लक्षात एक मतासाठी त्यांना जवळपास 6 रुपये 79 पैसे खर्च आला. तर नाना पटोले यांनी एक मतासाठी 9.91 रुपये खर्च केले. त्यापाठोपाठ बसपचे मोहम्मद जमाल (31 लाख 75 हजार 934 रुपये) तर वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे (25 लाख 39 हजार 536 रुपये) यांचा क्रमांक आहे. बीआरएसपी ऍड. सुरेश माने यांनी 10 लाख 36 हजार 770 रुपये खर्च केले. काही उमेदवारांनी 14 हजार रुपयांच्या घरातच खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाला दिली. जमाल यांना एका मतासाठी 100 रुपये तर डबरासे यांनी 97 रुपये खर्च केले. माने यांना एक मतासाठी 303 रुपये खर्च आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com