गजानन महाराज पालखीचा आज अकोल्यात मुक्काम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

अकोला : संत गजानन महाराज पालखीचे बुधवारी सायंकाळी भाैरद येथे आगमन झाले. यावेळी पालखीच्या स्वागतासाठी भाविकांना गर्दी केली होती. गुरुवारी पालखीचे शहरात आगमन होईल.

पालखी भाविकांच्या दर्शनासाठी मुंगिलाल बाजोरिया शाळेच्या क्रीडांगणात जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्री गजानन महाराज यांची पालखी मंगळवारी शेगाव येतून पंढरपूरकरिता रवाना झाली आहे. रात्री पासर येथे पालखीचा मुक्का होता. बुधवारी गायगाव मार्गे पालखी भाैरद येथे पोहोचली.

गुरुवारी शहरातील विविध मार्गाने मार्गक्रम करीत पालखी मुंगिलाल बाजोरिया शाळेत पोहचेल. पालखीच्या स्वागतासाठी श्री गजानन महाराज स्वागत समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. याशिवाय शहरात विविध ठिकाणी पालखी व वारकऱ्यांचे स्वागत केले जाईल. आळसी संकुलसमोर दुपारी चार वाजता खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, किशोर मांगटे पाटील, तेजराव थोरात आदींच्या उपस्थितीत पालखीचे स्वागत केले जाईल.

Web Title: gajanan maharaj palakhi in akola city today