alandi
alandi

आळंदी येथे गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रप्तिष्ठा 

शेगाव : श्री क्षेत्र अलंकापुरी आळंदी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांची संजीवन समाधी व पुण्यसलिला माता इंद्रायणीच्या पावित्र्याने दर्शनीय व वंदनीय पवित्रभूमी, या पवित्र भूमित श्री गजानन महाराजांचे संगमरवरी मंदिराचे बांधकाम पुर्णत्वास आले असून हे श्री संस्थेचे 18 वे  मंदिर आहे. 

श्री मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याअंतर्गत 10 ते 15 फेबु्रवारी पावेतो श्रींच्या मुर्तीची धर्मशास्त्रानुसार विधीवत संपुर्ण सौपस्कार होऊन 15 फेब्रुवारीला सकाळी 8.15 वा. या शुभ मुहूर्तावर श्रींच्या मुर्ती प्राणप्रातिष्ठेसोबतच श्री गणेश, श्री विठ्ठल, रुख्मिणी, श्री नवदुर्गा देवीची प्राणप्रतिष्ठा, हजारो भाविकांच्या उपस्थितीत टाळमुदंगाच्या गजरात, भक्त, मंडळीच्या जयघोषात व ब्रम्हवृंदांच्या मंत्रोपचारात सानंद संपन्न झाली.

स्थापन झाल्यानंतर मंदिरावर कलशारोहण होवून नाण्यांचा व पुष्पांचा वर्षाव श्रींच्या जयघोषात करण्यात आला. तसेच सकाळी 11 वाजता श्री गणेश पंचायतन व श्री विष्णु यागाची पुर्णाहुती झाली. या सोहळ्यामध्ये दि. 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पावेतो दररोज पारंपारिक काकडाआरती, श्री विष्णु सहस्त्रनाम श्री ज्ञानेश्‍वररी पारायण, श्री गजानन विजय ग्रंथ पारायण, हरिपाठ व हरिकिर्तनाचे कार्यक्रम  झाले. या सोहळ्यानिमित्त् श्री क्षेत्र आळंदी मधील श्री वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यु, श्री हभप किर्तनकार, भागवतकार, वारकरी विद्यार्थी, अलंकापूर निवासी यांना निमंत्रीत करण्यात आले असून सर्वांनी भोजनप्रसादाचा लाभ घेतला. श्री वारकरी संस्थेचे अध्वर्यू, श्री हभप किर्तनकार वारकरी विद्यार्थी, सुवासिनीसह ब्रह्मवृंद या सर्वांना वस्त्र व प्रमाणी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. श्रींच्या कृपेने सोहळा अत्यंत नियोजनबध्द  पार पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com