यिनच्या जिल्हाध्यक्षपदी गझाला खान व नीलेश कोढे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नागपूर - यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्षपदी काटोल येथील ई-जनरेशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीची गझाला खान (ग्रामीण) व धनवटे राष्ट्रीय महाविद्यालयाचा नीलेश कोढे (शहर) यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी कमला नेहरू महाविद्यालयाचा संकेत दुरुगकर व एनआयटी पॉलिटेक्‍निक कॉलेजचा निखिल आष्टणकर यांची निवड झाली. निवडीनंतर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील निवडून आलेल्या विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. 

तरुणांमधील नेतृत्वगुणाला चालना मिळावी, या उद्देशाने नागपूर जिल्ह्यात "यिन' प्रतिनिधींच्या निवडीसाठी नुकत्याच निवडणुका घेण्यात आल्या. त्यातून निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींची सकाळच्या शहर कार्यालयात लेखी परीक्षा, संवाद कौशल्य आणि प्रकट मुलाखत घेण्यात आली. यातून ही निवड करण्यात आली. सर्वप्रथम लेखी परीक्षा, संभाषण कौशल्य स्पर्धा, त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे गुणवत्तेवर आधारित दोन अध्यक्ष व दोन उपाध्यक्ष म्हणून उमेदवारांची निवड करण्यात आली. या वेळी उमेदवारांनी एकमेकांचे अभिनंदन करत आनंदोत्सव साजरा केला. निवडणूक प्रक्रियेत परीक्षक म्हणून सकाळचे वरिष्ठ बातमीदार मंगेश गोमासे व निखिल भुते यांनी काम पाहिले. या निवडणूक प्रक्रियेतून शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना चालना मिळाल्याचे व यातूनच समाजाचे उद्याचे नेतृत्व विकसित होईल, असे मत नवनियुक्त प्रतिनिधींनी व्यक्त केले. 

"यिन'च्या नागपूर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नीलेश कोढे म्हणाला,"निवड झाल्याबद्दल खूप आनंदित आहे. माझ्या कामाला दाद मिळाल्यामुळेच माझी या पदासाठी निवड झाली. तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे आणि त्यांच्यासाठी व्यासपीठ निर्माण व्हावे, यासाठी मी काम करणार आहे. 

ग्रामीणच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गझाला खान म्हणाली, "निवड झाल्याचा मला आनंद आहे. मी या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी काम करणार आहे. बहुतांश सरकारी योजना या ग्रामीण भागातील गरजू युवकांपर्यंत पोचत नाहीत. त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि त्या लोकांपर्यंत व विशेषतः युवकांपर्यंत पोचाव्यात यासाठी मी काम करणार आहे. 

Web Title: Gajhala Khan and Nilesh kodhe Yin's district president