गांधीमार्गानेच आतंकवाद सोडविता येईल - जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

वर्धा - आतंकवाद आणि प्रदूषित जल-वायूंचा आज जगासमोर सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. या विक्राळ समस्यांचे निराकरण महात्मा गांधीजींनी दाखविलेल्या मार्गानेच होऊ शकते, यात शंका नाही. गांधींजी हे शक्ती, ऊर्जा आणि प्रेरणास्थान असल्यामुळेच राजस्थानातील पाणीसंकटावर मात करता आली. बापूंच्या मूलभूत विचारानुसार कृतिआराखडा अमलात आणला तर ही संकटे सोडविता येतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी सेवाग्राम येथे केले. 

सेवाग्राम आश्रम परिसरात आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (ता. ३०) आयोजित कार्यक्रमात ते मुख्य वक्‍ते म्हणून बोलत होते. 

कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, ॲड. मा. म. गडकरी, गांधी विचार परिषदेचे भरत महोदय, सरपंच रोशना जामलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

राजेंद्र सिंह म्हणाले, आपण भविष्यातील जल-वायूसंदर्भातील धोक्‍याची शक्‍यता समजून घेतली पाहिजे. गांधीजींच्या बुनियादी विचारानुसार मानवी हृदय परिवर्तन झाल्यास या समस्येवर मात करता येईल. राजस्थानमध्ये भीषण पाणीटंचाईमुळे तरुणांनी गावे सोडली होती. मुले व वृद्धच गावात राहिले. पाणी नसल्यामुळे रोजगार संपला. विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडावे व युवकांनी पाण्यावर काम करावे, असा सल्ला मिळू लागला. याचदरम्यान गांधीजींचे हिंद स्वराज्य पुस्तक वाचण्यात आले आणि जल-वायू समस्येवर उपाय, मार्ग आणि दिशा मिळाली. युवकांसोबत तलाव आणि बंधाऱ्यांच्या कामांना सुरुवात केली. भूमीवर पडणारा प्रत्येक थेंब जमिनीच्या पोटातच गेला पाहिजे, यासाठी जनजागृती करण्यात आली. पाणी हे जीवन असल्याचे सत्य सर्वांना स्वीकारावे लागले, असेही ते म्हणाले. संचालन जयवंत मठकर यांनी केले. प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी आभार मानले.

Web Title: gandhi route terrorism will be redeemed