व्यापाऱ्याला भोसकून लुटणारी टोळी गजाआड

  नागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलेले आरोपी.
नागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलेले आरोपी.

उमरेड  (जि.नागपूर) : व्यापाऱ्याला भोसकून त्याच्याजवळील रोख लुटणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात यश मिळविले आहे. रविवारी रात्री ही कामगिरी पोलिसांनी केल्याची चर्चा रंगली होती. आज पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. 
या प्रकरणी फिर्यादी निकेश महेश तोलानी (वय 29, रा. उमरेड) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ते उमरेड-इतवारी भागात असलेल्या युनियन बॅंकेत त्यांचे पूजा एजन्सीच्या व्यवहाराचे पैसे भरण्यासाठी जात होते. बॅंकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अज्ञात चार आरोपींनी कोयत्याने त्यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले. त्यांच्या बॅगमध्ये असलेली 8 लाख 53 हजारांच्या रकमेसह बॅग हिसकावून पळ काढला. उमरेड पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला होता. घटनेचे गांभीर्य पाहता स्थानिक गुन्हे शाखेकडे समांतर तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दोन पथके नेमून तपास सुरू केली. सूत्रांची माहिती व सायबर सेलच्या साहाय्याने संशयित आरोपी सुमित प्रभाकर सोमकुवर (वय 22, रा. अंबाडी, ता. सौसर, जि. छिंदवाडा, म.प्र.), मंगेश ऊर्फ गुड्डू बिरजू पडोलिया (वय 23, रा. वाढोणा काटोल), मंगेश संतोष खरपुरीया (वय 21, रा. वाढोणा, काटोल) व सय्यद यास्मिन ऊर्फ चिनी वल्द सय्यद कलीम (वय 19, रा. यादवनगर एकता कॉलनी, नागपूर), कासीम ऊर्फ पप्पू अहमद खान पठाण (वय 25, रा. सुरेंद्रगढ गौसीया मस्जीद, गिट्टी खदान) यांना सोमवारी सकाळी 9 वाजता ताब्यात घेत विचारपूस केली. त्यांनी संगनमताने लूट घडवून आणल्याचा गुन्हा कबूल केला. गुन्ह्यात लुटलेली रक्कम व शस्त्र व वाहन आरोपींकडून हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई सपोनि जितेंद्र वैरागडे, पंकज वाघोडे, सचिन मत्ते, पोउपनि जावेद शेख, लक्ष्मीप्रसाद दुबे, पोहवा जयप्रकाश शर्मा, रमेश भोयर, राजेंद्र सनोडीया, अविनाश राऊत, दिनेश अदापुरे, रामा आडे, राधेशाम कांबळे, बालाजी साखरे, प्रणय बनाफर, सत्यशिल कोठारे, अमोल वाघ, साहेबराव बहाळे, अमोल कुथे व सायबर सेलचे सतिश राठोड यांनी पार पाडली. 
असा रचला कट 
आरोपी कासीम उर्फ पप्पू हा फेटरी येथील गोदामात काम करीत होता. त्याने पूजा एजन्सीचे मालक निकेश तोलानी यांना मोठी रक्कम बॅकेत नेताना पाहिले होते, त्याच्या पुढकारातून तोलानी यांना रक्कम लुटण्याची योजना आखली व योजणेप्रमाणे घटना तारीखच्या पूर्वी मंगेश पडोलिया, मंगेश खरपुरीया व सय्यद यासीन यांना उमरेड येथे सोबत नेले व संपूर्ण माहिती दिली. त्यानुसार त्यांच्यावर नजर ठेवली व लूटले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com