प्रियकराला मारहाण करून युवतीवर सामूहिक बलात्कार 

प्रियकराला मारहाण करून युवतीवर सामूहिक बलात्कार 

नागपूर - हायवेवर अंधारात प्रियकरासोबत गप्पा करीत बसलेल्या प्रेमीयुगुलावर दोन आरोपींनी हल्ला केला. युवकाला मारहाण केली तर युवतीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर युवतीला अर्धनग्नावस्थेत सोडून पळ काढला. अनिल वसंता थेटे (43, रा. खरसोली गाव, बुटीबोरी) व बाबा रामदास भगत (35, रा. हुडकेश्‍वर गाव) या नराधमांना गुन्हे शाखा पोलिसांनी आठ तासांत अटक केली. 

पीडित 19 वर्षीय नेहा (बदललेले नाव) ही हुडकेश्‍वरमधील महात्मानगरात राहते. ती बी. कॉमच्या तृतीय वर्षाला शिकते. वर्गमित्र गिरीश (बदललेले नाव) याच्याशी तिचे प्रेमसंबंध आहेत. शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ते दोघेही दुचाकीने हुडकेश्‍वर हद्दीत जबलपूर हैदराबाद महामार्गावर गेले. रस्त्यावर दुचाकी लावून अंधारात गेले. थेटे व भगत हे दोघे तेथे आले. दोघांनाही अंधारातून खेचून रस्त्याच्या कडेला आणले. "तुम्ही कोण आहात?, अंधारात काय करीत होते? असे विचारले. घाबरलेल्या गिरीश व नेहा यांनी पळायचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी दोघांचाही पाठलाग करून पकडले. आरोपींनी सर्वप्रथम पैशाची मागणी केली. मात्र, दोघांकडेही पैसे नव्हते. त्यानंतर नेहाला शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे गिरीश चिडला व शिवीगाळ केली. आरोपींनी गिरीशला मारहाण करून पिटाळून लावले. त्यानंतर नेहाला जंगलात नेऊन गॅंगरेप केला. 

असा आला प्रकार उघडकीस 
गिरीश धावत ढाब्यावर पोहचला व ढाबा मालकाला सांगितले. त्यानंतर शंभर नंबरवर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. हुडकेश्‍वर ठाण्याचे पोलिस ढाब्यावर पोहचले. गिरीशला सोबत घेऊन घटनास्थळ गाळले. मात्र, तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. गॅंगरेपचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने दोन पथके आरोपींच्या शोधासाठी लावले. पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी आरोपींच्या वर्णनावरून माहिती काढली. घटनेच्या आठ तासातच मुख्य आरोपी अनिल थेटेला अटक केली. त्याने बाबा भगतचा पत्ता दिला. 

पालकांनो सावधान! 
मुली रात्री-बेरात्री घराबाहेर पडत असतील तर पालकांनी सतर्क व्हायला पाहिजे. मुलींना कुणासोबत जात आहे? किमान एवढा प्रश्‍न तरी विचारायला पाहिजे. पारडी येथे अशाच प्रकारे प्रियकरासोबत अंधारात उभ्या असलेल्या शिक्षिकेवर सहा जणांनी बलात्कार केला होता, त्या आरोपींना 20 वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली. वर्षभरापूर्वी उमरेड रोडवरही चार युवकांनी प्रियकराला पिटाळून युवतीवर गॅंगरेप केला होता. अशा घटनांमधून मुलींनी, पालकांनी बोध घेण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com