चिमुकलीवरील सामूहिक बलात्काराने हादरले चिखली

चिमुकलीवरील सामूहिक बलात्काराने हादरले चिखली

चिखली : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहराच्या बाजार समिती परिसरात कुटूंबियांसमवेत झोपलेल्या नऊ वर्षीय चिमूकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादाय घटना शुक्रवारी (ता. 26) रात्री चिखली येथे घडली. पिडीत मुलगी झोपेत असताना नराधमांनी तीला निर्जन स्थळी नेवून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

याप्रकरणी चिखली पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरातील नागरीकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी (ता.29) या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी तसेच भविष्यात असे प्रकार होवू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाव्यात या मागणीसाठी चिखली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढून तहसीलदार चिखली यांना निवेदन देण्यात आले.

या घटनेचा निषेध करण्यासाठी स्थानिक पंचमुखी महादेव मंदिर परिसरामध्ये शहरातील सर्व समाज, राजकीय पक्ष, संघटना आणि समाजघटकांची बैठक संपन्न झााली. या बैठकीमध्ये या घटनेच्या निषेधार्थ तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी सोमवारी (ता.29) चिखली शहरात बंद पाळण्याचे तसेच निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सोमवारी (ता.29) सकाळी 9 वाजता स्थानिक बसस्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, जयस्तंभ चौक, महात्मा बसवेश्‍वर चौक, बैलजोडी चौक, चिंच परिसर, बागवानपुरा या परिसरातून निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शहरातील नागरीक आणि विशेषत्वाने महिला उपस्थित होत्या. यावेळी तहसीलदार चिखली यांना निवेदन देवून सदर प्रकरणातील नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करीत भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी शहरातील टवाळांच्या टोळक्यांना पोलिसांनी आवर घालण्याचीही मागणी करण्यात आली. 

या प्रकरणी चिखली पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या एका आरोपीला चिखलीमधून तर एकाला जालन्यातून अटक केली असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे. ह्या आरोपींना कोणतीही दयामाया न दाखवता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मोर्चेकर्‍यांच्या वतीने करण्यात आली आहे. ह्या निषेध मोर्चादरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधिक्षक संदीप डोईफोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी, पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ यांनी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवून उपाययोजना केल्या होत्या.

शहरामध्ये पहिल्यांदाच या निषेधार्ह घटनेच्या विरोधात नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरलेली आहे. त्यामुळे सोमवारी आठवडी बाजार असूनही शहरातील 100 टक्के व्यावसायिक प्रतिष्ठाणे स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com