कार चोरणारी परप्रांतीय टोळी गजाआड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

अमरावती : महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून अत्याधुनिक कार चोरणारी टोळी गुन्हेशाखेच्या हाती लागली आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली असून मुख्य सूत्रधार अद्याप पसार आहे.
विनोद शंकर गिऱ्हे (रा. शेलूवेताळ, ता. मूर्तिजापूर. जि. अकोला) आणि इम्रान खान इस्माईल खान (रा. सुफियानगर, अमरावती) असे अटक झालेल्यांची नावे आहेत.

अमरावती : महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून अत्याधुनिक कार चोरणारी टोळी गुन्हेशाखेच्या हाती लागली आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली असून मुख्य सूत्रधार अद्याप पसार आहे.
विनोद शंकर गिऱ्हे (रा. शेलूवेताळ, ता. मूर्तिजापूर. जि. अकोला) आणि इम्रान खान इस्माईल खान (रा. सुफियानगर, अमरावती) असे अटक झालेल्यांची नावे आहेत.
वलगावकडून अमरावतीच्या पंचवटी चौकाकडे येत असताना दोन दिवसांपूर्वी एमएच 11 बीएस 9719 क्रमांकाच्या तवेरा कारमधील दोघांची चौकशी केली असता त्यांच्याकडे दस्तऐवज आढळले नाही. त्यामुळे कार चोरीची असल्याचे लक्षात आले. चौकशी केली असता त्यांच्याकडून आतापर्यंत मारुती सुझुकी (एमएच 11 बीएच 9719) जिचा क्रमांक खोडलेला आहे. मारुती सुझुकी (एमएच 12 पीएन 8461) यासह टोयोटा इटियास (एमएच 09 बीएक्‍स 1554) या कार जप्त केल्या आहेत. दोन कारचे इंजिन व चेचीस क्रमांक खोडलेले आहे. या टोळीने अमरावतीसह महाराष्ट्र, मध्य प्रदेशातसुद्धा चोरी केल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. कार चोरल्यानंतर काही कारची अमरावती शहरात इंजिन आणि चेचीस क्रमांकांची खोडतोड केली जायची. एवढेच नव्हे तर चोरीच्या कारचे सुटेभाग वेगळे करून त्याची विल्हेवाट लावली जात होती. त्यामुळे कार चोरीच्या टोळीचे अमरावती शहराशी धागेदोरे असल्याचे दिसून येते. यात चोरी करणारे वेगळे. कार चोरी करून दुसऱ्याला ती सोपविल्यानंतर त्या कारमध्ये काही बदल करून तिची विक्री केली जायची. प्रत्येक टप्प्यात असलेल्या व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. अमरावतीसह इतरही जिल्ह्यांतील कार चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या कारचा समावेश
ज्या कार पोलिसांनी जप्त केल्या त्यात पोलिस निरीक्षक गणेश अणे यांच्याही कारचा समावेश आहे. ती कार यवतमाळ येथून चोरीस गेली होती. त्याव्यतिरिक्त एक कार नागपूरच्या उमरेड येथून चोरीस गेल्याची नोंद आहे. उर्वरित कारच्या मूळ मालकांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A gang of stealing cars arrested