अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

यवतमाळ : दुचाकी व घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला गजाआड करण्यात यश आले. विधीसंघर्षग्रस्त बालकासह दोघांना अटक करून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एलसीबीच्या पथकाने ही कारवाई शनिवारी (ता.27) उमरखेड येथे केली.

चेतन मनोज पवार (रा. चोखामेळा वॉर्ड, उमरखेड), हर्षल उर्फ सॅन्डी विलास बेलपत्रे (रा. इंदिरानगर, उमरखेड) अशी संशयितांची नावे आहेत. महागाव येथील डॉ. मोतेवार यांच्या घरी चोरी करणारे उमरखेड शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज चौक गाठून दोघांना ताब्यात घेतले. त्यापैकी एक विधीसंघर्षग्रस्त बालक निघाला. त्यांच्या ताब्यात असलेली दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. त्यांचा साथीदार हर्षल उर्फ सॅन्डीला मारेगाव येथून ताब्यात घेतले. त्याने नागेशवाडी येथून एक दुचाकी चोरली होती. पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणून मोबाईल, तीन दुचाकी असा एकूण दोन लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A gang of thieves arrest