स्टार बसच्या वाहकांचा विद्यार्थिनीवर गॅंगरेप

Rape
Rape

नागपूर - शाळकरी मुलीला फ्लॅट स्किमच्या निर्माणाधीन इमारतीत नेऊन तिच्यावर चौघांनी सामूहिक अत्याचार केला. ही घटना मानकापुरात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. गॅंगरेप करणारे सर्व आरोपी स्टार बसमध्ये वाहक म्हणून नोकरीवर आहेत.

उमेश ऊर्फ वर्षपाल रामेश्‍वर मेश्राम (वय २२, रा. पारडी, इटगाव, ता. पारशिवनी), धर्मपाल दादाराव मेश्राम (वय २२, रा. पारडी, ता. पारशिवनी), आशीष काशिनाथ लोखंडे (वय २५, ॲलेक्‍सिस हॉस्पिटलजवळ, पूजा रेसिडेन्सी) आणि शैलेश ईश्‍वर वंजारी (वय ३३, रा. मेहंदी, पारशिवनी) अशी आरोपींची नाव आहेत. 

पीडित १६ वर्षीय मुलगी प्रिया (बदललेले नाव) ही पवननगर, यशोधरा चौक येथे आईवडील आणि बहिणीसह राहते. ती सध्या सीताबर्डीतील एका नामांकित महाविद्यालयात अकरावीत शिकते. घरची आर्थिक स्थिती व्यवस्थित नसल्याने ती मनपाच्या ‘स्टार बस’ने महाविद्यालयात ये-जा  करते. जून २०१८ दहावीत असताना स्टार बसचा कंडक्‍टर आशीष लोखंडे याची तिच्यावर नजर पडली. त्याने रोज ये-जा करतेवेळी तिच्याशी संबंध वाढविले. मदतीच्या निमित्ताने तिच्याशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २९ जून २०१८ ला प्रियाला त्याने मानकापुरात असलेल्या खोलीवर नेले. तिला विश्‍वासात घेऊन लग्न करण्याचे आमिष दाखवले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. चार महिने तो तिचे लैंगिक शोषण करीत होता. 

चौघांनाही अटक 
प्रियाने आईसह यशोधरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ते प्रकरण घटनास्थळ असल्यामुळे मानकापूर पोलिसांना वर्ग केले. मानकापूर पोलिसांनी आरोपींची शोधाशोध केली. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाले होते. आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास आरोपींना अटक केली.

मित्रांसाठी रचला कट
प्रिया ही आशीषच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. आशीषने प्रेमसंबंधाबाबत अन्य तीन मित्र धर्मपाल, उमेश, शैलेश यांनाही सांगितले. त्यांनाही प्रियाशी शारीरिक संबंधाची ऑफर त्याने दिली. त्यासाठी स्वतःच कट रचला. प्रियाला शाळेतून थेट रूमवर नेले. शारीरिक संबंधादरम्यान तीनही मित्र तेथे पोहोचले. त्यांनी आरडाओरड करून वस्तीत सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर सर्वांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 

संबंधासाठी वारंवार तगादा 
चौघांनीही प्रियावर बलात्कार केल्यानंतर नेहमीप्रमाणे ते प्रियाला दमदाटी करून रूमवर नेऊन लैंगिक शोषण करीत होते. अनेकदा चौघेही दारू पिऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करीत होते. कॉलेज सोडून तिला रूमवर नेले जात असल्यामुळे ती कंटाळली होती. त्यामुळे तिने होणाऱ्या अत्याचाराबाबत आईला कल्पना दिली.

आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार 
 जलालखेडा - नरखेड तालुक्‍यातील बेलोना आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच शाळेच्या शिपायाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी शिपाई अशोक शांताराम चरडे (वय ३९, रा. नरखेड) याला अटक केली आहे.   

बेलोना येथे मातोश्री सुमनताई आदिवासी आश्रमशाळा आहे. पीडित १३ वर्षीय आदिवासी मुलगी सहाव्या वर्गात शिकत आहे. या मुलीच्या असहायतेचा फायदा घेत शिपाई अशोक चरडेने तिचा विनयभंग केला. सोबतच याची वाच्यता करू नये; अशी धमकी दिली. त्यामुळे भीतीने तिने कुणाला काहीच सांगितले नाही. मात्र, महाशिवरात्रीनिमित्त पीडिता दोन दिवसांपूर्वी तिच्या घरी पांढुर्णा (मध्य प्रदेश) येथे गेली होती. दूरवर शिकणारी आपली मुलगी नैराश्‍यात असल्याचे पालकांच्या लक्षात आले. मुलीला विश्‍वासात घेऊन पालकाने विचारणा केल्यावर विनयभंग केल्याचे तिने सांगितले. पालकांनी लगेच नरखेड गाठत पोलिसांत तक्रार दिली. काटोलचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनानुसार आरोपी अशोक चरडे याच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून आरोपी अशोक शांताराम चरडेला अटक केली आहे.

ही घटना दोन महिन्यांपूर्वीची आहे. तक्रारीनुसार हा विनयभंगाचा प्रकार आहे. आरोपीवर बलात्काराचे कलम व पोस्को लावण्यात येऊन अटक केली असून करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
- विक्रम कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी काटोल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com