मेडिकलमध्ये होणार "जेरियाट्रिक सेंटर'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मेडिकलमध्ये होणार "जेरियाट्रिक सेंटर'
नागपूर : उपराजधानीतील वयवर्षे 75 असलेल्या वृद्धांसाठी "गुड न्यूज' आहे. वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मेडिकलमध्ये 30 खाटांचे जेरियाट्रिक सेंटर तयार करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने पूर्वीच मंजुरी दिली. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांना सामंजस्य करारासाठी प्राधिकृत करण्यास मंजुरी दिली आहे.

मेडिकलमध्ये होणार "जेरियाट्रिक सेंटर'
नागपूर : उपराजधानीतील वयवर्षे 75 असलेल्या वृद्धांसाठी "गुड न्यूज' आहे. वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मेडिकलमध्ये 30 खाटांचे जेरियाट्रिक सेंटर तयार करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने पूर्वीच मंजुरी दिली. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांना सामंजस्य करारासाठी प्राधिकृत करण्यास मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमाअंतर्गत (नॅशनल प्रोग्रॅम फॉर हेल्थ केअर ऑफ द एल्डरली-एनपीएचसीई) देशात आठ जेरियाट्रिक सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यात नागपूरच्या मेडिकलची निवड झाली. नागपूरच्या केंद्रासाठी 11 कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. सेंटरच्या उभारणी खर्चाच्या फार्म्युल्यात बदल झाला आहे. खर्चाचा 60 टक्के वाटा केंद्र सरकार करणार तर 40 टक्के वाटा राज्य सरकारचा असेल.
सेंटरमध्ये चार कोटी 44 लाखांचा खर्च राज्य सरकार करणार आहे. खाटांच्या आंतररुग्ण विभागाची स्वतंत्र सोय, तज्ज्ञ डॉक्‍टर, परिचारिका, अटेंडन्टसह विविध मनुष्यबळ व साधने उपलब्ध असेल. स्वयंचलित खाटा, व्हेंटिलेटरसह जागतिक दर्जाच्या निदानाचे उपकरण असतील. काही महिन्यांपूर्वी हे सेंटर औरंगाबादेला पळविण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी दै. "सकाळ'ने ही बाब प्रकाशात आणली. जेरियाट्रिकतज्ज्ञ डॉ. संजय बजाज यांनी हे केंद्र नागपुरात व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांसह सरकारकडे भूमिका मांडली होती.

खर्चाचा तपशील
- पायाभूत सुविधा व फर्निचर- दोन कोटी
- मनुष्यबळासाठी - चार कोटी 18 लाख
- लसीकरण व औषधांसाठी- प्रत्येकी एक कोटी
- यंत्रसामग्री - 50 लाख
- प्रशिक्षणासाठी - 20 लाख

सध्या वृद्धांवरील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांची कमतरता आहे. केंद्र सरकारने नागपूरच्या मेडिकलसह देशातील आठ संस्थांमध्ये प्रादेशिक वृद्ध वैद्यकीय केंद्र सुरू करण्याचे निश्‍चित केले. यामुळे मेडिकलमध्ये दोन पदव्युत्तर जागांची वाढ होईल. त्यामुळे वृद्धांना शास्त्रशुद्ध पद्धतीने अद्ययावत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
- डॉ. अभिमन्यू निसवाडे,
अधिष्ठाता, मेडिकल.

जेरियाट्रिक केंद्रात औषधांसह, वृद्धांच्या आजारावरील लसीकरणाची सोय होईल. मात्र, जेरेयाट्रिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एमडी) आणि यावर संशोधन कार्य सुरू करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा.
- डॉ. संजय बजाज,
जेरियाट्रिकतज्ज्ञ, नागपूर.

Web Title: Gariatric Center in Medical