आश्रमशाळेतील विद्यार्थिनीसह दोघींची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

घाटंजी (जि. यवतमाळ) - तालुक्‍यातील रामपूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थिनीसह शहरातील आणखी एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही घटना आज, मंगळवारी घडल्या.

शेतकरी आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात महिनाभरात चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. राजश्री चौरंग कोटनाके (वय १६) हिने आज, मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आश्रमशाळेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता त्रिशा राम अग्रवाल हिने घरात गळफास लावून आत्महत्या केली. 

राजश्री कोटनाके ही रामपूर येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता दहावी शिकत होती. सकाळी आश्रमशाळेत नाश्‍ता केल्यावर तिने आत्महत्या केली. मुलींनी आरडाओरड करताच शिक्षकांनी घटनास्थळ गाठले. तत्काळ रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला दाखल करण्यात आले. तेथून तिला घाटंजी ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे डॉक्‍टरांनी राजश्रीला  मृत घोषित केले. 

पालक आल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह यवतमाळला पाठविण्यात आला. घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी भुवनेश्‍वरी, तहसीलदार हामंद यांनी रुग्णालयात जाऊन पालकांचे सांत्वन केले तसेच आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. 

मुख्याध्यापक, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार माजी सरपंच मोतीराव कनाके यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. राजश्रीजवळ एक चिठ्ठी सापडली असून, त्यात आत्महत्येचे गूढ दडल्याची चर्चा आहे. 

त्रिशा अग्रवाल ही समर्थ विद्यालयाची नववीची विद्यार्थिनी होती. ती अभ्यासात हुशार व सुस्वभावी होती. शिकवणी वर्गाला जाण्याची वेळ झाल्याने घरच्यांनी खोलीमध्ये जाऊन बघितले असता, ही घटना समोर आली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक नीलेश उरकुडे यांच्यासह पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्रिशाच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

समाजमन सुन्न
गेल्या काही महिन्यांपूर्वी नवोदय विद्यालयातील सातवीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती, तर काही दिवसांपूर्वी महागाव तालुक्‍यातील वैद्यकीय व अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. महिनाभरात घडलेली ही पाचवी घटना आहे. जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

Web Title: ghatanji vidarbha news girl student suicide