मुंगोली खाणीतून कोळसा तस्करी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : वेकोलि वणी क्षेत्राच्या मुंगोली कोळसा खाणीतून हायवा (एमएच-34, एवी -973) कोळसा भरून जात असताना मुंगोली गावाजवळ उलटले. ही घटना सोमवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली. यामुळे कोळसा तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे.

हायवा ट्रक रामदेव यादव यांच्या मालकीचा आहे. चालकाचे नाव पप्पू सिंग आहे. मुंगोली कोळसा खाणीतून कोळसा घुग्गुस येथील रेल्वे सायडिंग येथे खाली करण्यात येणार होता. परंतु हा हायवा ट्रक मुंगोली-घुग्गुस मार्गे न जाता मुंगोली मार्गे नेण्यात आला. याच मार्गावर हायवा उलटला. मुंगोली कोळसा खाणीचा कोळसा पुरवठा अदानी पावर प्लांट, गोंदियाला केला जातो. वेकोलिने मागील वर्षी कोळसा तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा दल तैनात केले आहे.
यापूर्वीसुद्धा या कोळसा खाणीत तस्करी जोमात सुरू होती.
महाराष्ट्र सुरक्षा दलसुद्धा आता निष्क्रिय ठरले आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात पैनगंगा कोळसा खाणीत वेकोलि सुरक्षा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दल आणि कोळसा तस्कर यांच्या संगनमताने होणारी कोळसा तस्करी समोर आली होती. हायवा ट्रक हा सप्रा ट्रान्स्पोर्ट कंपनी चालवतो. आता वेकोलि प्रशासन कोळसा वाहतूक करणाऱ्या सप्रा ट्रान्स्पोर्टवर काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ghuggus : Coal smuggling from mungoli mine