सेवाकार्य हीच जायन्ट्‌सची ओळख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नागपूर - नाना चुडासामा यांच्या प्रेरणेतून साकारलेला जायन्ट्‌स समूह सेवाकार्यामध्ये अग्रेसर आहे. रंजल्यागांजल्यांना मदतीचा हात देणाऱ्या जायन्ट्‌सची सेवाकार्य हीच ओळख असल्याचे प्रतिपादन शुक्रवारी (ता. 16) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर - नाना चुडासामा यांच्या प्रेरणेतून साकारलेला जायन्ट्‌स समूह सेवाकार्यामध्ये अग्रेसर आहे. रंजल्यागांजल्यांना मदतीचा हात देणाऱ्या जायन्ट्‌सची सेवाकार्य हीच ओळख असल्याचे प्रतिपादन शुक्रवारी (ता. 16) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

जायन्ट्‌सच्या 42 व्या आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जायन्ट्‌स आंतरराष्ट्रीय अध्यक्ष शायना एन. सी., आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी, मुरुद्दीन शेववाला, शिरीष कापडिया, बलदेव पटेल, एस. पी. चतुर्वेदी, दिनेश मलानी आदी उपस्थित होते. हल्ली सामाजिक संस्था 4-5 वर्षांमध्ये बंद पडत असल्याचे दुर्दैवी चित्र सर्वत्र दिसत असताना चार दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या जायन्ट्‌सचे कार्य गौरवनीय असल्याचे गडकरी म्हणाले. ज्याप्रकारे नाना चुडासमा आपल्या शब्दांनी विद्यमान राजकीय स्थितीवर टिप्पणी करायचे त्याचप्रमाणे जायन्ट्‌सचे कार्यदेखील समाजाला जागृत करणारे ठरत असल्याचे गौरवोद्‌गार गडकरी यांनी काढले. यावेळी गडकरी यांच्या हस्ते अवयव दान प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले.
शायना एन. सी. यांनी जायन्ट्‌सतर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच दिल्लीत उद्योजक म्हणून ओळख असलेले गडकरी मनाने आणि कार्याने समाजकारणी असल्याचे त्या म्हणाल्या. उद्‌घाटन सत्रापूर्वी "रोशनी' ग्रुपने देशभक्तिपर गीत सादर केले. तीन दिवस चालणाऱ्या संमेलनात विविध क्षेत्रांतील दिग्गज मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला प्रदर्शनाचे प्रमुख डॉ. कमल जैन, संमेलनाचे समन्वयक राजेश जोशी, संमेलनाध्यक्ष घनश्‍याम मेहता, संमेलन सचिव संजय जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: giants 42 sammelan