गिरड टेकडी परिसरात वाघाची दहशत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

गिरड (जि. वर्धा) : येथील बाबा फरीद दर्गा टेकडी परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टेकडी परिसरात चराईला गेलेल्या कळपातील एका बकरीला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

गिरड (जि. वर्धा) : येथील बाबा फरीद दर्गा टेकडी परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टेकडी परिसरात चराईला गेलेल्या कळपातील एका बकरीला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
गिरड येथील वामन किचक यांच्या मालकीची शेळी आहे. सायंकाळच्या सुमारास टेकडीवरून गावाच्या दिशेला शेळ्यांचा कळप येत होता. दरम्यान, कळपातील एका शेळीवर वाघाने हल्ला करून ठार केले. मागील आठवड्यातसुद्धा वामन तुपे यांच्या मालकीच्या चार शेळ्या वाघाने ठार केल्या होत्या. गिरड टेकडीला लागून वस्ती असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने टेकडी परिसरातील वास्तव्यास असलेल्या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girad hill area under tiger terror

टॅग्स