रेल्वेस्थानकावरून मुलीचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

नागपूर  : उपचारानंतर गावी परतण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या 13 वर्षीय मुलीचे अपहरण झाले. ही घटना उघडकीस येताच सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. सीसीटीव्ही यंत्रणेच्या मदतीने अपहरणकर्ता मुलीला अमरावती-जबलपूर एक्‍स्प्रेसमधून पळवून घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले. गाडीतच अपहरणकर्ता मनोजकुमार महतो (37, रा. खगरिया, बिहार) याच्या मुसक्‍या आवळून मुलीची सुटका करण्यात आली.

अपहरण झालेली मुलगी मध्य प्रदेशातील असून, दिव्यांग आहे. नियमित उपचारासाठी सोमवारी सकाळी ती वडिलांसह नागपुरात आली होती. उपचारानंतर ते गावी परतण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आले. गाडीला वेळ असल्याने ते फलाट क्रमांक एकवर पार्सल ऑफिसजवळील दगडी बाकावर थांबले. थोड्याच वेळात मुलगी झोपी गेली. काही वेळानी वडिलांचाही डोळा लागला. महतोने मुलीला झोपेतून उठविले आणि हात धरून अमरावती-जबलपूर एक्‍स्प्रेसने घेऊन गेला. वडिलांना जाग येताच मुलगी दिसली नाही. त्यांनी रेल्वेस्थानक पिंजून काढले. मात्र, उपयोग झाला नाही. तत्काळ आरपीएफ ठाणे गाठून कैफियत मांडली. उपनिरीक्षक होतीलाल मीणा, गौरीशंकर एडले यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात महतो मुलीला घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. गाडीत स्कॉटिंगवर असलेल्या आरपीएफ जवानांशी संपर्क साधून माहिती दिली. जवानांनी डबे तपासण्यास सुरुवात केली. मागच्या डब्यातील जनरल कोचमध्ये महतो मुलीसह बसलेला दिसला. त्याला पकडून इटारसी स्थानकावर उतरवले व मागाहून येणाऱ्या रेल्वेतून नागपुरात आणले. कायदेशीर प्रक्रियेनंतर महतोला अटक करून मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले.
अपहरणकर्ता पाच मुलांचा बाप
अपहरणकर्ता महतोला तीन मुली आणि दोन मुले आहेत. तो बिहारचा रहिवासी असला तरी अलीकडे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे बारदाण्याच्या कामासाठी आला होता. वेतन मिळाल्यानंतर पैसे पोहोचवण्यिासाठी तो घरी जात होता. रेल्वेस्थानकावर मुलगी दिसली आणि दारूच्या नशेत तिला पळविल्याचे तो सांगतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl abduction from railway station