शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्‍लील चाळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नागपूर : शिकवणीचे पैसे देण्यासाठी गेलेल्या एका 16 वर्षीय विद्यार्थिनीशी शिक्षकाने अश्‍लिल चाळे केले. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. रामकृष्ण नामदेवराव सुरुसे (45, रा. सुदाम रोड, साईबाबा बेकरीसमोर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे गुरूशिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासला गेला. 

पीडित मुलगी ही अकराव्या वर्गात शिकते. शिक्षक रामकृष्ण सुरुसे हा दारोडकर चौकात एका ठिकाणी शिकवणी घेतो. मुलीने रामकृष्णकडे जेईईची शिकवणी लावली होती. ख्रिसमसनिमित्त 25 ते 27 डिसेंबरपर्यंत शिकवणीला सुटी होती. रामकृष्णने मुलीच्या वडिलांना फोन करून "मला गावाला जायचे असल्याने पैशाची आवश्‍यकता आहे. तेव्हा पैसे पाठवा,' असे म्हटले. वडिलांनी मुलीला तिला 5 हजार देऊन शिकवणी वर्गात पाठविले. मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास ती शिकवणी वर्गात गेली. त्यावेळी रामकृष्ण हा एकटाच तेथे बसला होता. मुलीने त्याला पैसे दिले. त्यानंतर परत जात असताना शिक्षकाने तिला बाहुपाशात ओढले. त्यानंतर तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने जोरदार प्रतिकार करीत शिक्षकाच्या तावडीतून पळ काढून घर गाठले आणि आपल्या आईवडिलांना माहिती दिली. त्यानंतर मुलीला घेऊन तिचे आईवडील पोलिस ठाण्यात आले. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून शिक्षक रामकृष्ण सुरुसे यास अटक केली.

Web Title: a girl assaulted by her teacher in nagpur