मुलीवर अत्याचारप्रकरणी संशयितास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

यवतमाळ - अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (ता. 24) सायंकाळी इंदिरानगरात घडली. प्रकरणी संशयित आरोपी राम बबन दमकोंडावार (वय 25, रा. इंदिरानगर, यवतमाळ) याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने बुधवारी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

रात्री हजारोंच्या संख्येत जमाव अवधूतवाडी पोलिस ठाण्यात धडकल्याने काही वेळ तणावपूर्ण वातावरण होते. संबंधित मुलगी घराबाहेर खेळत असताना संशयिताने तिला बोलावून घराच्या टेरेसवरअत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. तिने घरी येऊन आईला घडलेला प्रकार सांगितला. ही घटना समजताच नागरिकांनी तरुणाला पकडून चोप दिला. त्याला अवधूतवाडी पोलिस ठाण्यात आणले. रात्री दहाला शहरात चर्चेला पेव फुटल्याने हजारोंच्या संख्येत जमाव पोलिस ठाण्यासमोर जमला. पोलिसांनी रात्री बाराला जमावाची समजूत घातली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयिताविरुद्घ गुन्हा नोंदविला.

Web Title: girl atrocity suspected arrested crime