मुलाच्या प्रेम प्रकरणातून आईचा सुरा भोसकून खून

मुलाच्या प्रेम प्रकरणातून आईचा सुरा भोसकून खून

आर्वी (जि. वर्धा) - प्रेम प्रकरणात मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून मुलीच्या भावाने मुलाच्या आईचा भरदिवसा सुरा भोसकून खून केला. यातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, अन्य तिघांचा शोध सुरू आहे. लगतच्या पिंपरी पुनर्वसन वसाहतीत शनिवारी (ता. १६) सायंकाळी उशिरा ही घटना घडली. बेबीबाई लक्ष्मणराव मेंढे (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. 

अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्‍यातील कवाडगव्हाण येथील ही महिला रहिवासी आहे. आरोपींच्या धाकाने ती कुटुंबासह लगतच्या पिंपरी पुनर्वसनमधील कृष्णराव देवकते यांच्या घरी सुमारे चार महिन्यांपासून भाड्याने राहत होती. शनिवारी (ता. १६) सायंकाळी सहाच्या सुमारास कवाडगव्हाण येथील गणेशराव काळे, मुलगा उमेश काळे व त्याचा एक साथीदार पिपरी पुनर्वसनमध्ये पोहोचले. त्यांनी बेबीबाई मेंढे यांना प्रकरण मिटवायचे आहे, असे सांगून पाणी मागितले व चहा करायला सांगितले. मारेकरी उमेश तेथे असलेल्या सचिन बोरकर, विलास सयाम व करण वानखेडे यांची माहिती घेत बेबीबाईकडे अचानक वळला. त्यानंतर त्याने कंबरेतील सुरा काढून महिलेच्या पोटात भोसकला. यादरम्यान सचिनने त्याला पकडले व सुरा हिसकला. बेबीबाईला सांभाळत असतानाच उमेशने पलायन केले. गणेश काळे याला दुचाकीसह पकडून त्यांनी पोलिसांच्या हवाली केले. सहा महिन्यांपूर्वी गणेश काळे यांच्या मुलीने घरू पलायन केले. तिला बेबीबाईच्या मुलाने पळवून नेले असावे, असा संशय असल्याने काळे कुटुंबीयाने १५ ऑगस्ट २०१८ ला बेबीबाईचे कवाडगव्हाण येथील घर जाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com