वाढदिवशीच डेंग्यूने घेतला बळी

संदीप रायपुरे
गुरुवार, 5 जुलै 2018

गोंडपिपरी (जि.चंद्रपूर) : अभियांत्रीकीचे (बिई) शिक्षण पुर्ण करून गावातील आपल्या घरी आलेल्या तरूणीला तापाने घेरले. तपासणीअंती तो डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले. उपचारासाठी चंद्रपूरहून नागपूर नेण्यात आले. परंतु तिचा दुर्दैवी अंत झाला. वाढदिवसच मृत्यूदिवस ठरलेल्या तरूणीवर पाणावलेल्या डोळ्यांनी अंत्यसंस्कार करण्याची वेळ पालकावर आली. गोंडपिपरी तालूक्यातील चेकघडोली गावात आज शेकडो नागरिकांचा हा प्रसंग बघतांना आपसूकच डोळे पाणावले.

गोंडपिपरी तालूक्यातील चेकघडोली गावात गेल्या पंधरा दिवसापासून तापाची साथ सूरू आहे. आरोग्य विभागाचे याकडे लक्ष नाही. ग्रामपंचायत प्रशासन केवळ आर्थीक मिळकतीत गूंग आहे. काही जागृक मंडळींनी या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. पण कुणाकडेही वेळ नाही. आशात गावात अनेक कुटुंबीय तापाच्या विळख्यात सापडले. काहींना डेंग्यूची लागण झाल्याचा निष्कर्ष गोंडपिपरीच्या डॉक्टरांनी काढला.

आजघडीला गावातील पन्नासहून आधीक जण तापाने त्रस्त आहेत. 
आपल्या शासकीय नौकरीची सेवा पुर्ण करुन भाऊराव कोटनाकै, हे चेकघडोली या आफल्या गावी स्थायीक झाले. त्यांची प्रतीक्षा नावाची मुलीने चंद्रपुरला बिई ईलेक्ट्रानिक चे शिक्षण पुर्ण केले. गावात काही दिवस निवांत राहून पुढील निर्णय घेऊ हा तिचा विचार होता.

पण गावात तापाची साथ आली. अन तपासणीनंतर तिला डेंग्यु झाल्याचे स्पष्ट झाले. चंद्रपुरला उपचारानंतर तिला नागपुरला हलविण्यात आले. उपचारादरम्यन तिचे निधन झाले. 5 जुलै रोजी प्रतीक्षाचा वाढादिवस होता. याच दिवशी तिच्यावर आंतीम संस्कार करण्याची दुर्दैवी वेळ पालकांवर आली. यावेळी उपस्थीतांनाही अश्रु आवरणे कठीण झाले.

Web Title: girl die in dengue