लसीकरणानंतर प्रकृती बिघडल्याने बालिकेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

तुमसर (जि. भंडारा) : तालुक्‍यातील बघेडा येथील गोवर, रुबेला लसीकरणानंतर आस्था रामेश्वर गोडांगे (वय 1) ही मुलगी प्रकृती बिघडल्याने दगावल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. नागपूर येथे वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

बुधवारी (ता. 12) आरोग्य विभागाकडून बघेडा या गावांमध्ये गोवर, रुबेला लसीकरण करण्यात आले. तीन दिवसांनंतर शनिवारी (ता. 15) आस्थाची प्रकृती बिघडली. तिला उलटी व शौच जास्त होत असल्यामुळे प्रथम तुमसर त्यानंतर भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. नागपूर मेडिकलला पाठविण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी (ता. 19) मृत्यू झाला. आरोग्य विभागाकडून या बालिकेचा मृत्यू उलटी व शौचामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. याच गावातील पाच बालकांची प्रकृती लसीकरणादरम्यान बिघडली होती. परंतु, उपचारानंतर त्यांची प्रकृती स्वस्थ असून ते धोक्‍याबाहेर आहेत.

Web Title: girl died after vaccination