पूरात विद्यार्थीनी गेली वाहून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

शेवंता आपापल्ली येथून दररोज महागाव येथे शाळेत जात होती, दरम्यान आज सकाळी इलापल्ली येथील नाल्यावर पूलावरुन तीचा तोल गेल्याने ती पूरात  वाहून गेली.

गडचिरोली : शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थीनीचा पूलाखाली तोल गेल्याने ती पूरात वाहून गेल्याची घटना आलापल्ली येथे आज (ता. 7) सकाळी घडली. शेवंता गणपत सातपुते असे वाहून गेलेल्या विद्यार्थीनीचे नाव असून ती महागाव येथील शाळेत बाराव्या वर्गात शिकत होती.

शेवंता आपापल्ली येथून दररोज महागाव येथे शाळेत जात होती, दरम्यान आज सकाळी इलापल्ली येथील नाल्यावर पूलावरुन तीचा तोल गेल्याने ती पूरात वाहून गेली. तिचा मृतदेह मुक्कापूर जवळील नात्यात आढळून आला. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना मीळताच त्यानी याबाबतची माहिती अहेरी पोलिसांना दिली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a girl drowned and died in canal at Gadchiroli

टॅग्स