पाहुण्याने केले चिमुकलीचे अपहरण

Poonam-Shahare
Poonam-Shahare

कळमेश्वर - पाहुणा म्हणून घरी आलेल्या व्यक्तीने सातवर्षीय चिमुकलीला चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना मोहपा येथील झोपडपट्टीमध्ये मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. पूनम नंदू शहारे असे अपहरण करण्यात आलेल्या चिमुकलीचे तर गंगाधर सूर्यभान यावले (५०, रा. तिगाव, ता. पांढूर्णा, मध्य प्रदेश) असे अपहरणकर्त्याचे नाव आहे. 

मोहपा येथील झोपडपट्टीमध्ये सुषमा नंदू शहारे यांचे कुटुंब राहते. त्यांना दोन छोट्या मुली आहेत. यातील आरोपी गंगाधर सूर्यभान यावले याने सात ते आठ वर्षांपूर्वी सुषमा यांच्या नणंदेची सोयरीमानेगाव येथे करून दिली होती. त्यामुळे गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्याचे शहारे यांच्या घरी येणे-जाणे होते. गंगाधर असा सोमवारच्या सायंकाळी शहारे यांच्याकडे आला. सर्वांसोबत जेवण घेऊन रात्रभर तेथेच थांबला. शहारे यांचे कुटुंब मजुरी करीत असल्याने मंगळवारच्या सकाळी सुषमा व तिचा पती नंदू दोघेही दोन्ही मुलींना आजोबाच्या रखवालीत ठेवून कामावर निघून गेले. साडेनउच्या सुमारास दरम्यान दोघीही बहिणी अंगणात खेळत असताना आरोपीने पूनमला दुकानातून चॉकलेट व बिस्किट घेऊन देण्याचे आमिष दाखवून सोबत घेऊन गेला.  दुपारपर्यंत परत न आल्याने आजोबांनी सायंकाळपर्यंत इतरत्र शोध घेतला. मात्र, ती न आढळल्याने अखेर सुषमा हिने पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसानी आरोपीविरोधात गुन्हा नोंद केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com