मांत्रिकाने केले असे काही, की त्याला झाली शिक्षा 

यवतमाळ
यवतमाळ

यवतमाळ : बुवाबाजी, अंश्रद्घेने समाजाचे वाटोळेच केले आहे. अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी कठोर कायदे करण्यात आलेत. तरीदेखील ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत मांत्रिक अघोरी उपचारासह महिलांचे शारीरिक शोषण करीत असल्याच्या अनेक घटना आपल्या आसपास घडतात. मुलीची प्रकृती चांगली राहत नाही, म्हणून पालकाने तिला मांत्रिकाकडे नेले. मात्र, त्याने लैंगिक अत्याचार केले. त्याच्या या कृत्याची शिक्षा न्यायालयाने त्याला दिलीच. 

अघोरी कृत्य 
सुनील हुसेन मेश्राम (वय 22, रा. चिंचोली) असे शिक्षा झालेल्या तथाकथित मांत्रिकाचे नाव आहे. घाटंजी तालुक्‍यातील पारवा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गणेशपूर येथील व्यक्तीच्या मुलीची प्रकृती चांगली राहत नसल्याने तो मुलीला घेऊन मांत्रिकाकडे घेऊन गेला. जमीन सारवून लिंबू कापून पीडितेच्या डोळ्यात पिळण्याचे अघोरी कृत्य मांत्रिकाने केले. गावाबाहेर मुलीचा उतारा काढावयाचा आहे, असे म्हणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

या प्रकरणी आरोपीविरुद्ध पारवा पोलिस ठाण्यात पोक्‍सोसह जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक गणेश भावसार यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. जिल्हा विशेष न्यायाधीश-एक व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. मोहिउद्दीन एम. ए. यांनी गुरुवारी (ता.28) निकाल दिला. आरोपी मांत्रिक सुनील मेश्राम याला पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नरेंद्र पांडे यांनी काम पाहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com