चार वर्षांच्या चिमुरडीचा वडिलांकडूनच खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

पिंपळगाव राजा (जि. बुलडाणा) - चारवर्षीय चिमुरडीचा तिच्या पित्यानेच विहिरीत फेकून खून केल्याचे उघडकीस आले. मुलगी व पित्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी ही घटना कुंबेफळ येथे घडली. याप्रकरणी आरोपीस आज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शेतातील विहिरीत चार वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह पाच दिवसांपूर्वी आढळला. मुलीच्या अंगावर कपडे नव्हते. ही घटना घातापाताची असल्याचा संशय आल्यावरून पोलिसांनी तपास केला. मुलीच्या पित्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 25 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

मला मुलींचा तिरस्कार
पोटच्या पोरीचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. तीन मुलींनंतर झालेला चवथा मुलगा आजाराने वारला. मुलींचा तिरस्कार असल्याने मी मुलीला मारले, असे आरोपीने पोलिसांना सांगितले.

Web Title: girl murder by father

टॅग्स