प्रेम प्रकरणातून युवतीचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

नागपूर - प्रेम प्रकरणातून झालेल्या वादात युवतीचा खून करण्यात आल्याची दुर्दैवी  घटना सोमवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास मानकापूर परिसरातील संत गजानननगरात घडली. महिमा असे मृत युवतीचे नाव आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय महिमा ऊर्फ कोमल महादेव विठ्ठवले हिच्यावर आरोपी असीम ताज महंमद पठाण (वय २४) रा. संत गजानननगर, गोधनी रोड, मानकापूर हा प्रेम करीत होता. मुलगा मुस्लिम असल्यामुळे महिमाच्या घरच्यांचा याला विरोध होता. त्यामुळे चिडलेल्या असीमने रागाच्या भरात महिमाचा खून केला. ही घटना रात्री सव्वादहाच्या सुमारास मानकापूर परिसरातील संत गजानननगराजवळील खुल्या मैदानात घडली.  घटनेनंतर आरोपीने स्वत: मानकापूर पोलिस ठाणे गाठले. असीमच्या बोटाला दुखापत झाल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी लगेच मेयो रुग्णालयात नेण्यात आले. उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: girl murder in love case