खून करून तरुणीचा चेहरा केला विद्रुप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

केळवद/सावनेर (जि. नागपूर) : तीक्ष्ण हत्याराने गळा चिरल्यानंतर डोके दगडाने ठेचून चेहरा विद्रुप करण्यात आलेल्या तरुणीचा मृतदेह केळवद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावळी (मोहतकर) येथील शिवारात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ओळख पटू नये म्हणून या तरुणीचा संपूर्ण चेहरा विद्रुप करण्यात आला होता. तसेच या तरुणीच्या एका हाताचा पंजा गायब आहे.

या तरुणीची ओळख पटली असून तिचे नाव खुशी परिहार (वय 19, रा. डिगडोह, हिंगणा) असल्याचे पोलिसांनी सांगितले. केळवद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर-बैतूल मार्गावरील सावळी मोहतकर जोडरस्त्यानजीक खोलगट भागात तरुणीचा मृतहेद गावकऱ्यांना शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आढळून आला. फोनवरून मिळालेल्या सूचनेवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृताची ओळख पटू नये यासाठी चेहरा दगडाने ठेचून व चाकूचे वार करून विद्रुप करण्यात आला होता. यासोबतच तिचा एक पंजाही गायब होता. तरुणीच्या दुसऱ्या हातावर "आशू' असा "टॅटू' आहे. तिच्या हातावर आणखी एक "टॅटू' आढळला. याशिवाय गळ्याखालील भागात "क्विन' असाही "टॅटू' आहे. तरुणीचा गळा चाकूने कापून खून करण्यात आल्यानंतर तिचा चेहरा विद्रुप करण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. तिच्या शरीरावर अन्य ठिकाणी चाकूचे घाव आढळून आले आहेत. काळी टी शर्ट, जिन्स हाफ पॅंट व लॉग शूज तिने परिधान केले होते.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl murder news