फेसबुक फ्रेंडचा प्रताप! बलात्कारातून प्रेयसी गर्भवती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

नागपूर : फेसबुक फ्रेंड्‌ने चॅटिंग करून प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवतीवर बलात्कार केला. सध्या ती चार महिन्यांची गर्भवती आहे. युवकाने लग्नास नकार दिल्यामुळे युवतीने हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. संतोष गणेश नागरीकर (रा. घाटंजी, यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 27 वर्षीय महिला चार वर्षांपूर्वी पतीपासून झाली. तेव्हापासून ती एकटीच राहाते. त्यादरम्यान, आरोपीशी तिची ओळख झाली. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान आता तिला गर्भधारणा झाली असून चार महिन्यांची गर्भवती आहे. आता आरोपी लग्नास नकार देत असून तिने पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार 
11 वर्षांच्या मुलीवर वस्तीतील युवकाने बलात्कार केल्याची घटना नवीन कामठी परिसरात उघडकीस आली. 11 वर्षीय पीडित मुलगी आपल्या घरी होती. त्यावेळी अक्षय सुरेश बोरकर (20) नावाचा आरोपी तिच्या घरी पाणी पिण्याच्या बहाण्याने आला. त्याने तिला पिण्याचे पाणी मागितले. ती पाणी आणण्यासाठी घरात गेली असता आरोपी तिच्या पाठीमागे आत शिरला व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो पळून गेला. हा प्रकार तिने आपल्या आईला सांगितला. तिच्या आईने मुलीला घेऊन पोलिस ठाणे गाठले व तक्रार दिली. पोलिसांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl Pregnant in rape