लग्नाचे आमिष; तरुणीवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

नागपूर - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना अंबाझरी पोलिस ठाण्यांतर्गत समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अक्षय ज्ञानेश्‍वर बरडे (27, रा. फ्रेण्ड्‌स कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. 

पीडित 25 मुलगी ही एका ज्वेलर्स दुकानात काम करीत असताना आरोपी हा मोबाईल विक्रीच्या दुकानात कामाला होता. त्या वेळी 2016 मध्ये दोघांची ओळख झाली. त्यानंतर मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी अत्याचार केला. आता मात्र तो विवाहाला नकार देत आहे. पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिली. महिला पोलिस उपनिरीक्षक नशिपून शेख यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 

Web Title: Girl raped case nagpur