बुलडाणा : वसतीगृहात शाळकरी मुलीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

चिखली येथील डीपी रोडवर असलेल्या समाजकल्याण संचालनालय महाराष्ट्र पुणे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात राहत असलेल्या सविता रामदास वाढोरे (वय 19, रा. ऊटी, ता. सेनगाव, जि. हिंगोली) हि नर्सींग काॅलेजला शिकत होती.

बुलडाणा : येथील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात आज (मंगळवार) सकाळी एका शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली येथील डीपी रोडवर असलेल्या समाजकल्याण संचालनालय महाराष्ट्र पुणे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात राहत असलेल्या सविता रामदास वाढोरे (वय 19, रा. ऊटी, ता. सेनगाव, जि. हिंगोली) हि नर्सींग काॅलेजला शिकत होती. आज सकाळी दहाच्या दरम्यान वसतीगृहातील रूमधील खिडकीला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली.

आत्महत्येमागील कारण समजू शकले नाहीत. पोलिसांची वसतीगृहात कुलुप बंद कारवाई केली. 

Web Title: girl school student suicide in Buldhana