युवतीचे वर्षभर लैंगिक शोषण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

रेस्टॉरेंटमध्ये कार्यरत युवतीचे मालकाने तब्बल वर्षभर लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी रेस्टॉरेंट मालकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

महेंद्र मेश्राम (३४, रा. राजेंद्रनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे नंदनवन परिसरात रेस्टॉरेंट असून, तिथून मेसचाही व्यवसाय चालवितो. मदतीसाठी त्याने ३३ वर्षीय पीडितेला व्यवस्थापक म्हणून कामावर कामावर ठेवून घेतले होते.

नागपूर - रेस्टॉरेंटमध्ये कार्यरत युवतीचे मालकाने तब्बल वर्षभर लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी रेस्टॉरेंट मालकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

महेंद्र मेश्राम (३४, रा. राजेंद्रनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे नंदनवन परिसरात रेस्टॉरेंट असून, तिथून मेसचाही व्यवसाय चालवितो. मदतीसाठी त्याने ३३ वर्षीय पीडितेला व्यवस्थापक म्हणून कामावर कामावर ठेवून घेतले होते. प्राप्त माहितीनुसार पीडिता विवाहित असून तिच्या पतीचे निधन झाले. तिलाही आधाराची गरज होती. आरोपीने हे हेरून तिच्यासोबत जवळीक निर्माण केली. लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. 

३१ एप्रिल २०१८ पासून हा प्रकार सुरू झाला. काही दिवस ते लिवईन रिलेशनशिपमध्येही राहिले. दरम्यान, त्याला पैशांची गरज पडली. त्याने पीडितेकडे पैशांची मागणी केली. पैसे दिल्यास व्यवसायात भागीदारीही देण्याची ग्वाही त्याने दिली. त्याच्यावर विश्‍वास ठेवून पीडितेने गाठीशी असलेले तब्बल ३ लाख ३२ हजार रुपये दिले. त्यानंतर इच्छा होईल तेव्हा आणि संधी मिळेल तिथे आरोपी तिच्यावर अत्याचार करायचा. लग्नाचा विषय काढताच तो टाळत होता. 

मार्च महिन्यात त्याने व्यवसायात भागीदारी देण्यास आणि लग्न करण्यास नकार दिला. पीडितेने नंदनवन ठाणे गाठून तक्रार दिली. त्याआधारे नंदनवन पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Girl Sexual abuse Crime