साक्षगंध झाल्यानंतर लैंगिक अत्याचार करून लग्न मोडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

एका तरुणीशी साक्षगंध केल्यानंतर तिचे लैंगिक शोषण करून लग्न मोडणाऱ्या भावी पतीसह तिघांवर वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रोहन प्रकाश लांगडे (३४), प्रकाश लांगडे आणि रुद्र प्रकाश लांगडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे 

नागपूर - एका तरुणीशी साक्षगंध केल्यानंतर तिचे लैंगिक शोषण करून लग्न मोडणाऱ्या भावी पतीसह तिघांवर वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रोहन प्रकाश लांगडे (३४), प्रकाश लांगडे आणि रुद्र प्रकाश लांगडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

अमरावती येथे राहणाऱ्या पीडित २६ वर्षीय तरुणीचा ख्रिश्‍तनंद बिल्डिंग, स्मृतिनगर येथे राहणाऱ्या रोहन प्रकाश लांगडे याच्याशी १ सप्टेंबर २०१८ रोजी साक्षगंध झाला होता. वाडी परिसरातच साक्षगंधाचा कार्यक्रम झाला होता.

साक्षगंधानंतर दोघांच्याही भेटीगाठी होत असत. तरुणी त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी जात होती. दरम्यान, रोहनने तिचे लैंगिक शोषण केले. कधी घरी तर कधी बाहेर नेऊन तो लैंगिक शोषण करीत होता. त्यानंतर त्याने १५ जानेवारीला लग्न करीत नसल्याचे तरुणीला सांगितले. त्यामुळे तरुणीला धक्का बसला. तिने ही माहिती रोहनचे वडील प्रकाश आणि भाऊ रुद्र यांना सांगितली असता त्यांनीही लग्नास नकार दिला. त्यानंतर रोहन आपल्या वडिलांसोबत अमेरिकेला निघून गेला. रोहन एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तरुणीच्या लैंगिक शोषणाची व्हिडिओ क्‍लिप तयार करून ती क्‍लिप वेबसाइडवर अपलोड करून तरुणीची बदनामी केली. त्यामुळे तरुणी संतप्त झाली. त्यानंतर तिने अमरावतीच्या गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. गाडगेनगर पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी हे प्रकरण नागपूर शहर पोलिसांकडे पाठविले. वाडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Girl Sexual Abuse Crime marriage