गोवर-रुबेला लसीमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

वाशीम - गोवर-रुबेला लसीमुळे शालेय मुलांच्या प्रकृती बिघडल्याच्या घटना विविध ठिकाणी घडत असतानाच पल्लवी कृष्णा इंगोले (वय 10) हिचा या लसीमुळे मंगळवारी मृत्यू झाला.

लसीमुळे प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून पल्लवीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिची प्राणज्योत आज मालवली. लसीमुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या आईने तक्रारीत केला आहे.

आंबेडकरनगर भागात राहणारी पल्लवी सरदार पटेल शाळेत शिकत होती. 27 नोव्हेंबर रोजी तिला गोवर-रुबेलाची लस दिली होती. त्यानंतर दोन दिवसांनी तिला गालफुगीचा त्रास सुरू झाला. वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अस्वस्थ असल्याने 7 डिसेंबरला तिला अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. सोमवारी (ता. 10) तिला रुग्णालयातून घरी सोडले. आज सकाळी अस्वस्थ वाटत असल्याने पुन्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच, तिचा दुपारी मृत्यू झाला.

लसीकरणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचे कारण कळणार आहे.
- डॉ. अविनाश अहिर जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशीम

Web Title: Girl Student Death by Govar Rubela Vaccination