पबजीने घेतला विद्यार्थिनीचा बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पारडीतील उपरे मोहल्ला येथे पबजीने एका 24 वर्षीय विद्यार्थिनीचा बळी घेतला. विद्यार्थिनीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. कोमल कैलाश चहांदे असे मृताचे नाव आहे.

नागपूर - पारडीतील उपरे मोहल्ला येथे पबजीने एका 24 वर्षीय विद्यार्थिनीचा बळी घेतला. विद्यार्थिनीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. कोमल कैलाश चहांदे असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल ही केडीके कॉलेजमध्ये पॉलिटेक्‍निकच्या तृतीय वर्षाला होती. कोमलला पबजी खेळाचा छंद लागला होता. ती तासन्‌तास टेरेसवर मोबाईलमध्ये गेम खेळत होती. त्यामुळे तिचे अभ्यासात दुर्लक्ष झाले. ती दोन विषयांत अनुत्तीर्ण झाली. मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास कोमल टेरेसवर गेली.

मोबाईलमध्ये पबजी खेळायला लागली. यादरम्यान, कोमलने पायऱ्यांवरील लोखंडी हूकला ओढणी बांधली व गळफास घेतला. सायंकाळी तिची मोठी बहीण काजल ही टेरेसवर गेली असता कोमल तिला गळफास लावलेली दिसली. तिने आरडाओरड केली. तिची आई आली. शेजाऱ्यांनी कोमलच्या गळ्यातील फास काढून तिला पहिल्या माळ्यावरील खोलीत ठेवले व घटनेची माहिती पारडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल शैलेश शेंडे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. याप्रकरणी पारडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl student suicide by pubgi game