मोबाईल न दिल्याने 13 वर्षांच्या मुलीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

महादूला - गेम खेळण्यात मग्न असणाऱ्या मुलीच्या हातातून आईने मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईल परत मागण्यासाठी मुलीने हट्‌ट केला. मात्र, तोच हट्‌ट मुलीच्या जिवावर बेतला. मोबाईल खेळण्यास न दिल्यामुळे मुलीने आत्महत्येचा पर्याय निवडला. ही दुर्दैवी घटना महादूला परिसरात उघडकीस आली. प्रीतल चंद्रमणी गोंडाणे (रा. मानवनगर) असे मृत मुलीचे नाव आहे. 

चंद्रमणी गोंडाणे हे डेकोरेशनचे काम करतात. त्यांना तीन मुली आहेत. मोठी मुलगी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे, तर मृत मुलीने नवव्या वर्गात प्रवेश घेतला होता. लहान मुलगी सातव्या वर्गात शिकत आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास प्रीतल व तिची आई दोघीच घरी होत्या. प्रीतल मोबाईलवर गेम खेळत होती. त्यावेळी आईने फटकारले व अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितले. तिच्या हातून मोबाईलही हिसकावून घेतला. दरम्यान, आई रागावल्यामुळे संतप्त झालेल्या प्रीतलने स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले व ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आईने स्वयंपाकघरातून बाहेर पडून बघितले असता मुलीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर प्रीतलला शेजाऱ्यांच्या मदतीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

मुलांचा अतिलाड पालकांना नडतो
लहान मुलांचा स्वभाव हट्‌टी असतो. त्यामुळे पालक त्यांचा हट्‌ट पूर्ण करण्यासाठी आटापीटा करतात. मुलांचा अतिलाड पालकांना नडतो. मुलांनी मागितलेली वस्तू न मिळाल्यास ते मुले कोणत्याही थराला जातात. आत्महत्येसारखे पर्याय निवडीपर्यंत मुलांची मजल जात असल्याचे पालकांनी गांभीर्याने घ्यायला हवे. 

Web Title: girl suicide by mobile