विमान प्रवासात वाचवला तरुणीचा जीव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नागपूर - चार दिवसांपूर्वी नागपूर ते चेन्नई या विमान प्रवासात तरुणीला भोवळ आली. विमानात डॉक्‍टर असल्यास मदतीसाठी यावे अशी घोषणा दिली. नागपूरचे दोन डॉक्‍टर धावून गेले. पंचविशीतील मुलीची हृदयक्रिया बंद पडली होती. तिला पालथे झोपविले व पाय वर केले. हृदयावर दाब देत ठोके काहीसे परत आणले. विमानातील ऑक्‍सिजन मॉक्‍स लावला. चेन्नईच्या विमानतळावर रुग्णवाहिकेसह डॉक्‍टरांचे पथक तैनात होते. हॉस्पिटलमध्ये उपचारातून ती बरी झाली. 

डॉ. सुनीता लवंगे व डॉ. अशोक लवंगे असे डॉक्‍टरांचे नाव आहे. 16 तारखेला लवंगे दाम्पत्य नागपुरातून चेन्नईला निघाले होते. चाळीस मिनिटांचा विमान प्रवास झाला होता. तरुणीला वैद्यकीय मदत हवी असल्याची घोषणा ऐकू येताच जागा सोडली. 30 हजार उंच आकाशात असल्याने इमर्जन्सी लॅंडिंग शक्‍य नव्हते. चेन्नई काही मिनिटांच्या अंतरावर होते. एकच पर्याय होता प्रथमोपचाराचा. तरुणीला तीन उलट्यादेखील झाल्या होत्या. शुद्ध हरपली होती. हृदयाचे ठोके बंद पडले होते. समयसूचकतेने तिच्यावर संजीवन क्रियेद्वारे उपचार करीत शुद्धीवर आणले. यानंतर तिला मानसिक आधार दिला, असे डॉ. सुनीता लवंगे यांनी सांगितले. 

पथक तैनात 
चेन्नईचे विमानतळ गाठताच उपचारासाठी संदेश दिला होता. त्यानुसार विमानातून उतरताच धावपट्टीवर अपोलो हॉस्पिटलची रग्णवाहिका तैनात होती. डॉ. कटकवार, डॉ. बुचे, डॉ. शरद रानडे व डॉ. सुनीता लंवगे यांचे तरुणीने आभार मानले. 

नागपूर बधिरीकरण तज्ज्ञांच्या संघटनेतर्फे सीपीआर तसेच संजीवन क्रियेसंदर्भात प्रसार व प्रचार करण्यात येतो. रस्त्यांवरील फेरीवाल्यांपासून तर चौकात, खासगी कार्यालयात बधिरीकरण तज्ज्ञांतर्फे सहा हजार नागरिकांना संजीवन क्रियेचे प्रशिक्षण दिले आहे. हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. यामुळेच विमानात मुलीचा जीव वाचवू शकले. 
- डॉ. सुनीता लवंगे, अध्यक्ष, बधिरीकरण संघटना, नागपूर शाखा

Web Title: girl survived the plane journey