गुंगीचे औषध देऊन प्रेयसीचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

नागपूर - गुंगीचे औषध देऊन प्रेयसीचे अपहरण केले. तसेच मध्य प्रदेशात नेऊन डांबून ठेवणारा प्रियकर आशीष भीमराव वाघमारेला (24, रा. यशोधरानगर, कामठी) सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. तसेच युवतीची सुटका केली.

पीडित 20 वर्षीय युवती मोनाली (बदलेले नाव) ही कामठीत राहते. तिचे आशीषवर प्रेम होते. मात्र, आईवडिलांनी तिचे पाच महिन्यांपूर्वी लग्न लावून दिले. त्यामुळे दोघेही दुःखी होते. लग्नानंतर सर्व सुरळीत सुरू असताना आशीष तिला लग्नाचा तगादा लावत होता. त्यामुळे दोघांनीही पळून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

17 नोव्हेंबरला दोघेही नागपुरातून पळून गेले. त्यांनी आरोपी बेबीताई शर्मा (कामठी) हिची मदत घेतली. तिने मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथील दीपक शर्मा या नातेवाइकाला खोलीची व्यवस्था करण्यास सांगितले. आशीष व मोनाली हे दोघेही होशंगाबादला गेले. तेथे आठवडाभर पती-पत्नीप्रमाणे राहिले. दोघांत कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. त्यामुळे मोनालीने आईवडिलांना बोलावून घेतले. तेथून सर्व नागपुरात आले. यानंतर सीताबर्डीत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

युवतीने रचले अपहरणाचे नाट्य
मोनाली व आशीष यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. लग्न झाल्यानंतर मोनाली आशीषसोबत पळून गेली. मात्र, परत जायचे असल्यामुळे तिने नाश्‍त्यात गुंगीचे औषध देऊन अपहरण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Girlfriend kidnapping