कौतुकास्पद! नवरदेवाऐवजी निघणार नवरीची वरात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 December 2019

नववधू (नवरी) नव्या नवरीचा साजशृंगार करून घोड्यावर स्वार होऊन वाजतगाजत, नाचत व आतषबाजी करीत वरात काढून लग्नमंडपी जाणार असल्याने या आगळ्या वेगळ्या वरातीला बघण्याची ओढ नागरिकांना लागली आहे. 

नागपूर : आज आलेली कपड्यांची फॅशन काही दिवसांनी जुनी होणार आहे. त्याजागी नवीन फॅशन येईन आणि कपड्यांचे शैकीन बाजारात खरेदीसाठी गर्दी करतील. आजच्या फॅशनेबल जगात आपण कुठेही मागे पडू नये यासाठी नवीन फॅशनचे कपडे खरेदी करण्यावर प्रत्येकाचा भर असतो. यासाठी ते कधीही कपडे खरेदी करण्यास तयार असतात. पूर्वी विशेष कारण असल्याशिवाय कपडे खरेदी केले जात नव्हते. आता मात्र फॅशननुसार कपड्यांची खरेदी केली जाते. 

जाणून घ्या - तीन बायकांच्या दादल्याची अजबगजब कहानी वाचली का?

असे म्हणतात आज आलेली नवीन कपड्यांची फॅशन जुनीच आहे. काही दशकांपूर्वी हीच फॅशन होती. आलटून पालटून कपड्यांची फॅशन येत असते. आपण त्याला नवीन समजतो असे घरचे ज्येष्ठ सांगतात. "इतिहास अपने आपकों दोहरात हैं' हे यावरून सिद्ध होते. तसेच जुने जानकार सांगतात पूर्वी मुलींची वरात काढली जात होती. मुलीकडील कुटुंबीय सर्व तयारी करून मुलीला मुलाच्या घरी लग्नासाठी आणत होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर मुलीकडील कुटुंबीय निघून जायचे. मुलीला मुलाकडेच पाठवायचे असल्याने असे केले जात होते. मात्र, कालांतराने यात बदल झाला आणि मुलांची वरात निघायला सुरुवात झाला. आता नवरदेव घोड्यावर स्वार होऊन वाजतगाजत व नाचत लग्न मंडपात जातो. 

हेही वाचा - नवरीची निघाली घोड्यावरून वरात 

विवाह सोहळ्यात नवरदेवाची घोड्यावर रुबाबात आणि थाटामाटात वरात निघणार.. नवरी मात्र, खाली मान घालून लाजत मुरडत लग्नमंडपात येणार... नवरदेवप्रमाणे नवरीलाही वरातीत घोड्यावर बसण्याची इच्छा असते. परंतु, बहुतांश मुली ही इच्छा बोलून दाखवत नाही. आता ही प्रथा मोडीत काढीत मुलींनीही मस्त वाजतगाजत थाटात वरात काढून तेवढ्याच तोऱ्यात लग्नमंडपी प्रवेश करावा. स्री-पुरुष समानतेच्या मानसिकतेतून नागपूरची उच्चशिक्षित तरुणी खुशबू खेडीकर हिने आपल्या नियोजित विवाहात घोड्यावरून वरात काढण्याचा निर्णय घेतला आहे. आता जग बदलत असल्याने व कुटुंबाचे पठबळ मिळत असल्याने मुलीही अशाप्रकारचा आनंद मिळवू शकतात, अशी खुशबू सांगते. 

Image may contain: 4 people, people smiling, people on stage
संग्रहित छायाचित्र

आयुर्वेदिक कॉलेज ले-आऊट येथील राजाभाऊ खेडीकर यांची कन्या खुशबू या उच्चशिक्षित अभियंता तरुणीचा विवाह विनोबानगर, तुमसर येथील दिलीपराव सोनेवाले यांचा मुलगा ज्ञानेश्‍वर यांच्याशी रविवारी (आठ डिसेंबर 2019) रोजी सायंकाळी सहाला जैन कलार समाज भवन, नागपूर येथे होणार आहे. या विवाह समारंभात नवरदेवाऐवजी नवरी वाजतगाजत आतषबाजीत वरात घेऊन येणार आहे. वरात सक्करदरा चौक, रेशीमबाग चौक या प्रमुख मार्गाने फिरून जैन कलार समाज भवन येथील लग्नमंडपी जाणार आहे. अशा पद्धतीने वरात काढण्याचा नागपूरमधील हा पहिलाच प्रसंग आहे. मात्र, अशा पद्धतीने घोड्यावर उच्चशिक्षित वधू वरात काढणार असल्याने याबाबत वेगळी उत्सुकता आहे. 

Image may contain: 1 person, smiling, standing, sky and outdoor
संग्रहित छायाचित्र

वरातीला बघण्याची नागरिकांना ओढ

लग्नसोहळ्यात अमाप पैसा खर्च करीत नवरीला डोलीमध्ये आणण्याचे प्रकार विदर्भात वाढले आहेत. आता नववधू (नवरी) नव्या नवरीचा साजशृंगार करून घोड्यावर स्वार होऊन वाजतगाजत, नाचत व आतषबाजी करीत वरात काढून लग्नमंडपी जाणार असल्याने छोटा ताजबाग परिसरात या आगळ्या वेगळ्या वरातीला बघण्याची ओढ नागरिकांना लागली आहे.

सविस्तर वाचा - #FridayMotivation साथ देते मी तुला... व्हीलचेअरवर पूर्ण केले सात फेरे! 

होणाऱ्या पतीचीही साथ
लग्नासाठी मुलाइतकेच मुलीकडील मंडळीपण आनंद साजरा करू इच्छितात. परंतु, मुलीकडील बाजू ही दुय्यम तर मुलाकडील बाजू वरचढ असा समज रूढ झाला आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी मी पुढाकार घेतला असून, यासाठी माझ्या होणाऱ्या पतीचीही मला साथ आहे. सासरच्या कुटुंबातही माझ्या वरातीबाबत खूप उत्सुकता आहे. 
- खुशबू खेडीकर, 
नियोजित वधू, नागपूर

भेद नष्ट करण्याचा उद्देश 
मुलींच्या कुटुंबातील सदस्यांनाही वरातीचा आनंद घेता यावा, लग्न मंडपापासूनच कुटुंबातील मुलगा आणि मुलगी हा भेद नाहीसा करून त्यांना सारखेच महत्त्व दिले जावे इतका साधा सरळ उद्देश या लग्नामागचा आहे. 
- चंदू खेडीकर,
खुशबूचे काका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The girl's going to ride a horse