लिफ्टच्या बहान्याने तरुणीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

चिमूर पोलीस स्थानक अंतर्गत येणाऱ्या बाम्हणी (काग) येथील रहीवासी असलेल्या व चिमूर येथील दुकानात काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणीवर लिफ्टच्या बहान्याने गावातीलच प्रमोद दुधनकर वय 35 वर्ष व राजु राऊत वय 36 वर्ष यांनी रात्रौ 6.45 च्या सुमारास विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तरूणीच्या तक्रारीवरून विनयभंग व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायदयाप्रमाणे गुन्हे नोंदविले असुन आरोपी फरार आहेत.
 

चिमूर - चिमूर पोलीस स्थानक अंतर्गत येणाऱ्या बाम्हणी (काग) येथील रहीवासी असलेल्या व चिमूर येथील दुकानात काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणीवर लिफ्टच्या बहान्याने गावातीलच प्रमोद दुधनकर वय 35 वर्ष व राजु राऊत वय 36 वर्ष यांनी रात्रौ 6.45 च्या सुमारास विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तरूणीच्या तक्रारीवरून विनयभंग व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायदयाप्रमाणे गुन्हे नोंदविले असुन आरोपी फरार आहेत.

चिमूर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या बाम्हणी (काग) येथे राहणारी 19 वर्षीय तरूणी चिमूर येथील जनरल स्टोअर्समध्ये कामाला आहे. ती रोज दुकानाच्या कामाकरीता गावावरून ठीक 10.30 ला चिमूरला येते आणि सांयकाळी 6.30 च्या दरम्यान मिळेल त्या वाहनाने गावाला परत जाते. 27 ऑगस्टलासुद्धा गावाकडे जाण्याकरिता चावडीचौक येथे थांबली असता, याच चौकातील केश कर्तनालयापुढे गावातीलच प्रमोद दुधनकर वय 35 व राजु राऊत वय 36 हे दोघे मोटारसायकल घेऊन उभे होते. गावातीलच आणि अनेकदा यांच्या मोटार सायकलने गावात गेल्याने त्यांना गावाला जाण्यासंबधी विचारणा केली.

तरूणीच्या विचारल्या नुसार त्यांनी लिफ्ट द्यायला होकार दिल्याने तरूणी मोटार सायकलवर बसली . मोटार सायकल प्रमोद दुधनकर चालवित होता त्याच्या मागे राजु राऊत व त्याच्या मागे तरूणी बसली होती . काही अंतर गेल्यावर 6.45 च्या सुमारास उमा नदीच्या पुलावर राजु राऊत याने मागे हात करून तरूणीस ओढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तरुणीने त्याला सोडावयास सांगीतले मात्र मी सोडणार नाही म्हणुन पुन्हा पुढे गेल्यावर जबरदस्तीने जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. तरूणीने आरडाओरडा केल्यास घाबरून त्याने दर्गा जवळून परत चावळी चौकात तरूणीस आणून सोडले.

Web Title: The girls molestation by pretense lift